मुंबई Railways Provided Food For RS 20 : उन्हाळ्यात रेल्वेत प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असते. मात्र रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जेवण मिळत नसल्यानं उपाशी पोटी प्रवास करण्याची वेळ येत होती. मात्र रेल्वे विभागानं जनरल डब्यातील प्रवाशांना बजेट फ्रेंडली जेवण उपलब्ध करुन दिलं आहे. रेल्वे विभागानं मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात लांब पल्ल्याच्या 15 प्रमुख रेल्वे स्थानकावर 20 रुपयात जेवण उपलब्ध करुन देणार आहे. महाराष्ट्रातील इगतपुरी, कर्जत, मनमाड, खंडवा, बडनेरा, शेगाव, पुणे, मिरज, दौंड, साईनगर शिर्डी, नागपूर, वर्धा, सोलापूर, वाडी आणि कुर्डूवाडी स्थानकावर ही सुविधा उपलब्ध आहे.
जनरल डब्यातील प्रवाशांना मिळणार 20 रुपयात जेवण :रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता 20 रुपयात जेवण मिळणार आहे. रेल्वेनं मंगळवारी याबाबतचा निर्णय घेतला असून त्याचं निवेदन जारी केलं आहे. जनरल डब्यातील प्रवाशांना आतापर्यंत जेवण पुरवण्यात येत नव्हत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेनं 20 रुपयात जनरल डब्यातील प्रवाशांना जेवण उपलब्ध करुन दिलं आहे. यात जनरल डब्यातील प्रवासांना एकोनॉमी मील फक्त 20 रुपयात देण्यात येणार आहे. त्यात सात पुऱ्या आणि बटाट्याची भाजी असणार आहे. तर 50 रुपयात प्रवाशांना नास्ता आणि जेवण करता येणार आहे.
कमी किमतीत पौष्टिक आणि स्वच्छ अन्न :रेल्वे प्रवाशांना कमी किमतीत पौष्टिक आणि स्वच्छ अन्न मिळावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त दरात जेवण, अल्पोपहार, कॉम्बो जेवण आणि पाणी बॉटल जनरल डब्याबाहेर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 20 रुपयांना उपलब्ध असलेल्या इकॉनॉमी मीलमध्ये सात पुरी (175 ग्रॅम), सुक्या बटाट्याची भाजी (150 ग्रॅम) आणि लोणचं यांचा समावेश असेल. 50 रुपयांना मिळणाऱ्या फराळासह जेवणाचं वजन 350 ग्रॅम असेल. त्यात दक्षिण भारतीय भात, राजमा-भात, खिचडी, कुलचे-भटुरा-छोले, पावभाजी, मसाला डोसा दिला जाणार आहे. पिण्याचे पाणी तीन रुपयांना दिले जात आहे, अशी माहिती उत्तर रेल्वे लखनऊ विभागाच्या वरिष्ठ डीसीएम रेखा शर्मा यांनी दिली. रेल्वे प्रवाशांना स्वच्छतेनं तयार केलेले पौष्टिक इकॉनॉमी अन्न दिलं जाणार आहे. इकॉनॉमी फूडची गुणवत्ता आणि स्वच्छता राखण्यासाठी देखील देखरेख केली जात आहे, असं उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक शोभन चौधरी यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- 'सुपरमॅन' बनायला गेला अन् कारागृहात पोहोचला! ट्रेनमध्ये सीट न मिळाल्यानं पठ्ठ्यानं छतावर झोपून केला 400 किमी प्रवास - Humsafar Express
- ठाणे स्थानकाचा 171 वा वाढदिवस : पहिल्या रेल्वेच्या आठवणींना दिला उजाळा, प्रवासी सुविधांवर भर देण्याची मागणी - Indian Railways completes 171 years
- Mumbai Railway Station Rename : मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख; ब्रिटिशकालीन स्थानकांचं होणार नामांतर