नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी विविध मागण्यासाठी गाझीपूर सीमेवर आंदोलन सुरू केलं आहे. सरकारनं हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी संभलला जाताना गाझीपूर सीमेवरुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांना गाझीपूर सीमेवर रोखण्यात आलं.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचा ताफा अडवला :विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी आज संभळला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गाझीपूर सीमेवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्या ताफ्याला रोखण्यात आलं. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा हे दोघं नवी दिल्लीहून संभलला जाण्यासाठी निघाले. मात्र गाझीपूर सीमेवर पोहोचल्यावर त्यांना रोखण्यात आलं. ताफ्याला रोखण्यासाठी पोलिसांनी चारही बाजूंनी बॅरिकेड्स लावले. गाझीपूर सीमेवर सध्या शेतकऱ्यांचा मोठा गोंधळ सुरू आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांचा ताफा पोलिसांनी अडवल्यानं यावेळी पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.
गाझीपूर गेटवर बॅरिकेडिंग :विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्या संभल दौऱ्यामुळे गाझीपूर गेटवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. गाझीपूर गेटवर पोलिसांकडून बॅरिकेडिंग करण्यात आले. पोलीस तपासणी करून वाहनांना पुढं जाण्यास मज्जाव करत आहेत. दिल्लीहून गाझियाबादकडं जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 च्या सर्व लेनवर सध्या प्रचंड वाहतूक कोंडी झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं दिल्ली मेरठ एक्सप्रेसवेवर पोहोचले. आंदोलन सुरू होताच दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. इंदिरापूरमचे सहायक पोलीस आयुक्त स्वतंत्र कुमार सिंह यांना याबाबत विचारलं असता, त्यांनी सांगितलं की, नागरिकांच्या सोयीसाठी पुरेसा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस जवान सातत्यानं प्रयत्नशील आहेत.
हेही वाचा :
- गौतम अदानी यांनी भारताला केले हायजॅक, अटक होणार नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
- प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहा, अब्रुनुकसानीच्या खटल्यात पुणे न्यायालयाचे राहुल गांधींना आदेश
- नागपुरात राहुल गांधींनी बनवले तर्री पोहे अन् मारला ताव; पाहा फोटो