नवी दिल्ली Rahul Gandhi Claimed ED Raid : ईडीच्या कारवाईबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी दावा केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 वरील चर्चेदरम्यान 'चक्रव्यूह' भाषणानंतर ईडीकडून माझ्यावर कारवाई केली जाऊ शकते आणि तशापद्धतीचं नियोजन सुरू असल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय.
चहा आणि बिस्किट घेवून प्रतिक्षा करतो :राहुल गांधी यांनी शुक्रवारी दावा केला की, "अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आपल्यावर छापे टाकण्याची योजना आखत आहे. ईडीच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितलं की छापेमारीची योजना आखली जात आहे. या छापेमारीसाठी मी मोकळ्या हातानं तयार आहे. चहा आणि बिस्किट घेवून मी त्यांची प्रतिक्षा करत आहे."
'चक्रव्यूह' भाषणामुळं ईडीची योजना : राहुल गांधी यांनी 29 जुलै रोजी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024 वर भाषण केलं होतं. गांधींनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते की, "देशातील शेतकरी, मजूर आणि तरुण घाबरले आहेत." राहुल गांधींनी भाजपाचं निवडणूक चिन्ह कमळ हे महाभारतातील 'चक्रव्यूह'शी जोडलं. या 'चक्रव्यूह' भाषणानंतरच ईडी माझ्याविरोधात कारवाईची योजना आखत असल्याचा दावा राहुल गांधींनी केला.
विरोधकांचा आरोप : भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांनी केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीनं जाणीवपूर्वक कारवा्ई केली असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. आता खुद्द राहुल गांधी यांच्यावर ईडी कारवाई करणार असल्याचा दावा त्यांनीच केलाय.
हेही वाचा -राहुल गांधींना जलद न्याय मिळवण्याचा अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी - Rahul Gandhi RSS defamation Case