महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला दिलासा ; रणजीत सिंह हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून दोषमुक्त - Ram Rahim Acquitted In Murder Case - RAM RAHIM ACQUITTED IN MURDER CASE

Ram Rahim Acquitted In Murder Case : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. रणजीत सिंह हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीमला उच्च न्यायालयानं दोषमुक्त केलं आहे.

Ram Rahim Acquitted In Murder Case
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 11:54 AM IST

Updated : May 28, 2024, 12:21 PM IST

चंदीगड Ram Rahim Acquitted In Murder Case :साध्वी बलात्कार आणि खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला पंजाब हरियाणा उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला रणजीत सिंह हत्या प्रकरणात दोषमुक्त केलं. उच्च न्यायालयानं मंगळवारी हा निर्णय दिला आहे.

महिला शिष्याचं लैंगिक शोषण उघड करण्याची भीती :रणजीत सिंह हा शिबिरातील महिला शिष्यांचं लैंगिक शोषण उघड करणाऱ्या निनावी पत्रामागं असल्याचा संशय गुरमीत राम रहीमला होता. सीबीआयनं म्हटलं होतं की, "रणजीत सिंह आणि त्याच्या एका बहिणीचा उल्लेख पत्रांमध्ये महिला प्रेमींच्या लैंगिक शोषणाबाबत करण्यात आला. पत्रातील मजकूर समोर आल्यानंतर जून 2002 मध्ये त्यांना कॅम्पमध्ये बोलावण्यात आलं. त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली. परंतु रणजीत सिंहनं आपण काहीही चुकीचं केलं नसल्याचं सांगत आरोपीची माफी मागण्यास नकार दिला."

रणजीत सिंह हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीम निर्दोष :डेरा प्रमुख राम रहीम सिंग त्याच्या दोन शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम आणि इतर तिघांना 2019 मध्ये 16 वर्षांपूर्वी एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. याशिवाय 2021 मध्ये डेरा व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्यासह चार आरोपींना दोषी ठरवण्यात आलं. मात्र आता पंजाब हरियाणा उच्च न्यायालयानं गुरमीत राम रहीमची या हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली.

हेही वाचा :

  1. Gurmeet Ram Rahim Got Parole : बलात्कारी गुरमीत राम रहिमला 30 दिवसांचा पॅरोल, आज संध्याकाळी येणार बाहेर
  2. Gurmeet Ram Rahim: राम रहीमने लावला टी20 क्रिकेटचा शोध?, व्हिडिओद्वारे केला अजब दावा
  3. Baba Ram Rahim: राम रहीमच्या फॅमिली आयडीवरून संपूर्ण कुटुंब गायब, आईडीवर फक्त हनीप्रीतचे नाव
Last Updated : May 28, 2024, 12:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details