पुलवामा (जम्मू काश्मीर) Encounter Militants and Security : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील फारसीपुरा मोरन भागात दहशतवादी आणि सैन्यामध्ये चकमक सुरू आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी दहशतवादी आणि सैन्यात चकमक सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांना या भागात दहशतवादी असल्याची पुष्टी माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार केला. त्याचं चकमकीत रुपांतर झालं. या चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सैन्याच्या जवानांना यश आलंय.
दहशतवादी लपून बसलेल्या परिसराला वेढा : प्राप्त माहितीनुसार या भागात दोन ते तीन दहशतवादी लपून बसले आहेत. तर सैन्याच्या 55 राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि पोलिसांनी संयुक्तपणे परिसराला वेढा घातलाय. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे बुधवारी पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि सैन्य यांच्यात झालेल्या चकमकीला जवळपास एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, शोपियान जिल्ह्यात अज्ञात लोकांनी परप्रांतीय व्यक्तीची हत्या केली होती.