बंगळुरू Prajwal Revanna Case: जेडीएसचे माजी खासदार प्रज्वल रेवन्ना याची बुधवारी शहरातील बोरिंग हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणी करण्यात आली. न्यायालयाकडून परवानगी मिळालेल्या एसआयटी अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता त्यांना रुग्णालयात नेलं. प्रज्वल याची बोअरिंग हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकानं वैद्यकीय तपासणी केली. लैंगिक क्रिया करण्याची पौरुषत्वाची चाचणी करण्यात आली. तपासणीनंतर सायंकाळी त्याला सीआयडी कार्यालयात नेलं. एसआयटीनं त्याची चौकशी केली. आणखी एका आठवड्यात अहवाल एसआयटीकडं पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आज पुन्हा कोर्टात हजर करणार : एसआयटीनं दोन दिवसांपूर्वी प्रज्वल रेवन्नाला 'पॉटेन्सी टेस्टसाठी' बोअरिंग हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी काही वैद्यकीय चाचण्यांसाठी कायदेशीर माहिती दिली. त्यामुळं न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर एसआयटीनं त्याला बुधवारी पुन्हा रुग्णालयात नेलं. न्यायालयाच्या मान्यतेनं प्रज्वल रेवन्नाच्या वैद्यकीय तपासणीसाठी बोअरिंग हॉस्पिटलच्या प्रमुखांनी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार केली होती. कोर्टानं त्याच्या एसआयटीला 6 जूनपर्यंत कोठडी दिली होती. कोठडीची मुदत आज संपल्यानं एसआयटी त्याला आज पुन्हा कोर्टात हजर करणार आहे.