रांची- पुणे येथील रहिवासी यशवंत हिरामण विनोद यांचे त्यांच्याच घरात राहणाऱ्या भाडेकरुन अपहरण केले. आरोपीचं नाव राजू झारखडंमधील मालदा येथील रहिवाशी आहे. त्याच्यासह साथीदाराला पोलिसांनी अटक केली.
अपहरण करण्यात आलेल्या यशवंत यांनी ४० खोल्या भाड्यानं दिल्या आहेत. त्यामधील एका खोलीत राजू हा गेल्या दीड वर्षांपासून राहत होता. राजूनं घरमालकाचा विश्वास जिंकून त्यांना तीर्थयात्रेला नेण्याच्या बहाण्यानं गंगासागर येथे नेले. तिथे साथीदारांच्या मदतीनं यशवंत यांचे अपहरण केले. त्यानंतर लपून ठेवण्यासाठी साहिबगंजच्या दियारा भागात नेले. पोलीस अधिकारी अमित सिंह म्हणाले, "अपहरण करणाऱ्यांनी यशवंत यांच्या मुलाला मोबाईलवरून फोन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. यानंतर घाबरलेल्या मुलानं आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी यशवंत यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की," रात्री साडेबारा वाजता मालदा जिल्ह्याच्या एसपींशी बोललो. त्यानंतर राजमहल एसडीपीओच्या नेतृत्वाखाली राजमहल, तीनपहार, राधानगर, बरहडवा आणि तळझारी या पाच पोलीस ठाण्यांच्या पोलिसांसह एक पथक तयार करण्यात आले."