अमरावती :सुप्रसिद्ध अभिनेते तथा आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना सोमवारी अज्ञात व्यक्तीनं ठार मारण्याची धमकी दिली आहे. पवन कल्याण यांच्या कार्यालयात कॉल करुन त्यांना ही धमकी देण्यात आली. यावेळी या कॉलरनं आक्षेपार्ह संदेशही पाठवल्याची माहिती पवन कल्याण यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. त्यांच्या जनसेना पक्षाच्या वतीनंही पवन कल्याण यांना ठार करण्याची धमकी मिळाल्याचं सोमवारी स्पष्ट करण्यात आलं आहे.
पवन कल्याण यांना धमकी मिळाल्यानं खळबळ : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना अज्ञात कॉलरनं ठार मारण्याची धमकी दिली आहे, अशी माहिती जनसेना पक्षानं आपल्या सोशल माध्यमातून दिली आहे. अज्ञात कॉलनं पवन कल्याण यांच्या कार्यालयात कॉल करुन ही धमकी दिली. कॉलरनं आक्षेपार्ह मॅसेज देखील पाठवला, असं जनसेना पक्षानं सोमवारी स्पष्ट केलं. "पवन कल्याण यांच्या कार्यालयात आगंतकुडी इथून धमकीचे फोन आले. अज्ञात कॉलरनं पवन कल्याण यांना ठार मारलं जाईल, अशी धमकी दिली. कॉलरनं पवन कल्याण यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरून मॅसेज पाठवले," असं जनसेना पक्षानं सोशल माध्यमात शेयर केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.