गोरखपूर Nepal Bus Accident :नेपाळ बस अपघघातात जळगाव जिल्ह्यातील तब्बल 27 भाविकांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या नागरिकांचे मृतदेह नेपाळहून महाराष्ट्रात आणले आहेत. दुसरीकडं उत्तर प्रदेश सरकारनं अन्य दोन बसमधील 48 प्रवाशांना गोरखपूरला आणून भुसावळमार्गे मुंबईला रेल्वेनं पाठवलं आहे. शनिवारी रात्री हे भाविक रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांच्या भावनेचा बांध तुटला. आपल्या मृत झालेल्या नातेवाईकांच्या आठवणीनं त्यांना रडू कोसळलं. या अपघातात परेशच्या मोठ्या भावासह पाच नातावाईकांचा मृत्यू झाला आहे.
नेपाळ बस अपघातात तब्बल 27 भाविकांचा मृत्यू :नेपाळ बस अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांच्या नातेवाईकांना त्यांच्या घरी सोडण्यात येत आहे. गोरखपूरच्या केसरवाणी ट्रॅव्हलच्या तीन बस पोखराहून काठमांडूकडं जात होत्या. यामध्ये 110 प्रवासी होते. बस तनहुन इथल्या अंबुखारेणी इथं पोहोचताच खराब हवामानामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे बस नदीत कोसळून हा भीषण अपघात घडला. यामध्ये 28 जणांचा जागीच मृत्यू झाला. काही जखमींवर काठमांडूमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात बसचा चालक मुस्तफा आणि गोरखपूर इथला रहिवासी असलेल्या हेल्परचाही मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह त्याच्या घरी पोहोचवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार आणलं गोरखपूरला :मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार बचावलेल्या रेल्वे प्रवाशांना गोरखपूर आणि महाराजगंज जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं गोरखपूरला आणण्यात आलं. इथं जिल्हा प्रशासन आणि भाजपाच्या प्रतिनिधींनी प्रवाशांशी चर्चा करुन त्यांची प्रकृती जाणून घेतली. जिल्हा प्रशासनाकडून प्रवाशांच्या खाण्यापिण्याची आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर प्रशासनानं महाराष्ट्रात जाणाऱ्या ट्रेनमध्ये विशेष बोगीत बसवून या भाविकांना महाराष्ट्रात पाठवलं.