बस्तर (छत्तीसगड) Chhattisgarh Naxalite Attack :छत्तीसगडच्याविजापूर आणि सुकमाच्या सीमावर्ती भागात मंगळवारी (30 जानेवारी) सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये चोरदार चकमक झाली. या चकमकीत तीन जवान हुतात्मा झाले आहेत. चकमकीत जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी रायपूरला विमानानं हलवण्यात आलं. बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी ही माहिती दिली. या चकमकीत १० हून अधिक जखमी झाले असून, त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना चांगल्या उपचारांसाठी एअरलिफ्ट करण्यात आल्याचं आयजींनी सांगितलं. चकमकीत किती नक्षलवादी ठार झाले किंवा किती जखमी झाले याची माहिती सध्या तरी मिळालेली नाही.
कुठे झाली चकमक : ज्या ठिकाणी चकमक झाली ती जागा जोनागुडा आणि अलिगुडा दरम्यान आहे. दररोज प्रमाणे टेकलगुडेम छावणीतून सैनिक शोधासाठी निघाले होते. शोध सुरू असताना, सैनिकांचा गट जोनागुडा आणि अलिगुडा दरम्यान पोहोचताच, आधीच घात करून बसलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. बस्तरचे आयजी पी सुंदरराज म्हणाले की, ज्या भागात चकमक झाली तो भाग घनदाट जंगल आहे. 2021 मध्ये याच भागात नक्षलवाद्यांनी एका हल्ल्यात 23 जवानांना हुतात्मा केलं होतं.
नक्षलवाद्यांना छावणी बांधण्याची भीती : नक्षलवाद्यांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी आणि त्यांची हालचाल थांबवण्यासाठी टेकलगुडेममध्ये सैनिकांची छावणी बांधण्यात आली होती. छावणी बांधल्यापासून नक्षलवादी दहशतीत होते. बस्तरच्या आयजीच्या म्हणण्यानुसार, नक्षलवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक छावणी उभारण्यात आली, ज्याचा फायदा सैनिकांना होत होता. छावणी बांधल्यापासून नक्षलवाद्यांमध्ये भीती होती.