नवी दिल्लीPM Modi New cabinet : देशात आज नवीन सरकार स्थापन झालं आहे. नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत आज अनेक मत्र्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकार 3.0 मध्ये अनेक महिला खासदारांचाही समावेश आहे. यात महाराष्ट्रातील एका खासदारांचा समावेश आहे. यात रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागलीय. यावेळी पीएम मोदींच्या टीममध्ये निर्मला सीतारामन, अनुप्रिया पटेल यांना पुन्हा संधी मिळली आहे. तसंच मोदी सरकारमध्ये अनेक नवीन महिला मंत्र्यांनाही संधी देण्यात आली आहे.
निर्मला सीतारामन :निर्मला सीतारामन यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. सीतारामन सध्या अर्थमंत्रालयाचा कारभार सांभाळत आहेत. मनमोहन सिंग यांच्यानंतर त्या दुसऱ्या अर्थमंत्री आहेत, ज्यांनी अर्थमंत्री म्हणून 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलाय.
अनुप्रिया पटेल : अपना दलच्या खासदार अनुप्रिया पटेल यांना पुन्हा मोदी मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकतं. मागील कार्यकाळात त्यांच्याकडं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदाचा कारभार होता. यावेळी त्यांना कोणतं खात मिळतं, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं यावेळी अपना दल (एस) नेत्या अनुप्रिया पटेल यांना तिकीट दिलं होतं. अनुप्रिया पटेल यांनी समाजवादी पक्षाचे (एसपी) उमेदवार रमेश चंद बिंद यांचा 37 हजार 810 मतांनी पराभव केला आहे. पटेल एनडीएच्या उमेदवार म्हणून सलग तिसऱ्यांदा येथून विजयी झाल्या आहेत. याआधी 2014 आणि 2019 मध्येही त्यांनी येथून निवडणूक जिंकली होती.
शोभा करंदलाजे : बेंगळुरू उत्तरच्या खासदार शोभा करंदलाजे यांना पुन्हा मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळतेय. यापूर्वीही त्या मंत्री होत्या.