ETV Bharat / bharat

इराणमधील युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये तरुणीनं काढले कपडे, काय आहे संपूर्ण प्रकरण? - IRAN DRESS CODE PROTEST

तेहरान मधील युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड रिसर्चच्या परिसरात एक तरुणी केवळ आपल्या अंतर्वस्त्रांमध्ये दिसली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. नेमकं प्रकरण काय, हे जाणून घेऊया.

Iranian female student arrested after removing clothes at university in Tehran
इराण ड्रेस कोड (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2024, 12:14 PM IST

तेहरान : एका इराणी तरुणीला युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये कपडे काढल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ही घटना शनिवारी घडली. देशातील इस्लामिक ड्रेस कोडच्या निषेधार्थ तरुणीनं तिचे कपडे काढले. तर काही रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलंय की, पोलिसांनी तरुणीशी गैरवर्तन केलं होतं. त्याविरोधात तिनं हे पाऊल उचललं.

इराणी पत्रकार मसिह अलीनेजाद यांनी या घटनेबाबत एक्स मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले, " इराणमधील युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड रिसर्चमध्ये नैतिकता पोलिसांनी एका विद्यार्थिनीला तिच्या 'अयोग्य' हिजाबमुळं त्रास दिला. परंतु, तिनं मागे हटण्यास नकार दिला. तसंच याला विरोध करण्यासाठी ती केवळ अंतर्वस्त्रांमध्ये विद्यापीठात फिरली. तिचं हे कृत्य इराणी महिलांच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचं एक शक्तिशाली स्मरणपत्र असेल. हो, आम्ही आमच्या शरीराचा वापर शस्त्रासारखा करतो. कारण, ही एक अशी व्यवस्था आहे. जिथं केस दिसण्यावरुनही महिलांना मारलं जातं."

विद्यापीठाचं म्हणणं काय? : इराणच्या सरकारी एजन्सी आयआरएनएनुसार, इस्लामिक आझाद विद्यापीठाचे जनसंपर्क महासंचालक आमिर महजौब यांनी रविवारी त्यांच्या एक्स अकाउंटवरुन या घटनेवर प्रतिक्रिया दिली. त्या विद्यार्थीनीनं 2 नोव्हेंबर रोजी अनैतिक कृत्य केल्याचा दावा महजौब यांनी केलाय. महजौब म्हणाले की, "उत्तर तेहरानमधील इस्लामिक आझाद विद्यापीठाच्या सायन्स अँड रिसर्च एका विद्यार्थिनीनं अशोभनीय कृत्य केल्यानंतर कॅम्पस सुरक्षेनं तिच्यावर कारवाई केली. तिला कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं." तसंच या विद्यार्थीनीवर मानसिक दबाव असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

तरुणीच्या सुटकेची मागणी : ॲम्नेस्टी या मानवाधिकार संघटनेनं तरुणीची तत्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. "तेहरानच्या इस्लामिक आझाद विद्यापीठात सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तरुणीनं अनिवार्य असलेला हिजाब घालण्यास नकार दिला. त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी हिंसाचार करत तरुणीला अटक करण्यात आली. विद्यापीठाच्या विद्यार्थिनीला इराणी अधिकाऱ्यांनी त्वरित आणि बिनशर्त सोडलं पाहिजे," असं मानवाधिकार संघटनेनं एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलंय. "अटकेदरम्यान तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि लैंगिक हिंसाचाराच्या आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होण्याची गरज आहे. जबाबदार असलेल्यांना कारवाई केली पाहिजे," असंही ॲम्नेस्टी संघटनेनं म्हटलंय.

हेही वाचा -

  1. महाविद्यालय प्रशासनानं घातलेली बुरखाबंदी योग्यच; मुंबई उच्च न्यायालयानं 9 विद्यार्थिनींची याचिका फेटाळली - Mumbai Hijab Controversy
  2. हिजाब बंदीचा निर्णय मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न नाही, महाविद्यालयाची उच्च न्यायालयात माहिती - Hijab Ban Issue
  3. कॉलेजच्या ड्रेसकोडमुळे हिजाब घालण्यास मनाई, विद्यार्थींनींच्या याचिकेवर उच्च न्यायालयात 'या' तारखेला होणार सुनावणी - Hijab and Burqa Ban News

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.