ETV Bharat / state

भिवंडीत वाहन तपासणीवेळी आढळली २ कोटी ३० लाख रुपयांची रोकड, भरारी पथकानं केली जप्त

निवडणुकीच्या निमित्तानं सर्वत्र कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. भिवंडीत वाहन तपासणीवेळी २ कोटी ३० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. वाचा सविस्तर...

भिवंडीत वाहन तपासणीवेळी २ कोटी ३० लाख रुपयांची रोकड जप्त
भिवंडीत वाहन तपासणीवेळी २ कोटी ३० लाख रुपयांची रोकड जप्त (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2024, 7:43 PM IST

Updated : Nov 5, 2024, 9:18 PM IST

ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भिवंडी शहरातील धामणकर नाका जवळ सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बापू सांगळे यांना मे. सीएमएस या कंपनीची रोख रक्कम घेऊन जाणारी गाडी अढळून आली. संबंधीत गाडी चालकास गाडीतील रोख रक्कमेबाबत विचारणा केली असता सदर रोकड ही मे. सीएमएस या कंपनीची असल्याचं नमुद केलं पण रक्कमेबाबत पुरावे तसंच रोख रक्कम हाताळणी क्युआर कोड सादर करता आला नसल्यानं ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास भिवंडीतील धामणकर नाका परिसरात वाहन तपासणी अधिकारी हेमंत पष्टे हे तत्काळ सहाय्यक पोलीस आयुक्त पूर्व यांच्या कार्यालयात पथकासह हजर झाले. गाडी क्र. एमएच. ४३/व्हिपी/७९२० मध्ये एकूण २ गार्ड, २ कस्टोडीयन आणि १ चालक असे एकूण ५ इसम होते. नंतर त्यांच्या उपस्थितीत त्या वाहनात असलेल्या बॅगमधील आणि एटीएम मशिनमध्ये भरावयाच्या सिल ट्रे मधील रोख रक्कमेची गणना केली असता त्यामध्ये एकूण रुपये २,३०,१७,६०० रक्कम आढळून आली.

याबाबतचे नोटांचे प्रकारानुसार म्हणजेच रुपये ५००, २००, १०० याबाबतचे सविस्तर विवरण पंचनाम्यात नमुद केले आहे. याबाबतची माहिती पवन कौशिक आयकर निरीक्षक (अन्वेषण शाखा) कल्याण यांना दिल्याने ते समक्ष हजर राहिले होते. त्याचप्रमाणे आचारसंहिता पथक प्रमुख सुधीर गुरव, सहाय्यक खर्च निरीक्षक शरद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पंचनामा पूर्ण करण्यात आला आहे. सदर सर्व रक्कम जप्त करण्यात आली असून सदर रक्कम सिलबंद करुन भिवंडी कोषागार विभागात जमा करण्यात आली आहे. याबाबत आयकर विभाग अधिक तपास करून अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती १३७ भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णयअधिकारी अमित सानप यांनी दिली.

हेही वाचा..

  1. विधानसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर 70 लाखांची रोख जप्त
  2. साताऱ्यात क्रेटा कारमधून १ कोटीची रोकड जप्त, रक्कम नेमकी कुणाची? तपास सुरू
  3. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई; 20 लाख रुपयांची रोकड जप्त

Last Updated : Nov 5, 2024, 9:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.