हातरस : जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलाला गेल्या अनेक दिवसांपासून पोटदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. अल्ट्रासाऊंडमध्ये त्याच्या पोटात घड्याळाच्या लहान सेल, ब्लेडचे तुकडे, खिळे इत्यादी 56 धातूचे तुकडे आढळले. मात्र, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला.
नेमकं काय आहे प्रकरण? : हातरस शहरातील रत्ननगरभा कॉलनीत राहणाऱ्या संचेत शर्मा यांच्या मुलाला काही दिवसांपासून पोटदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुटुंबीयांनी मुलाला जयपूरच्या एसडीएमएच रुग्णालयात नेलं. तिथं काही दिवस उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं. मात्र, मुलाला पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं 25 ऑक्टोबर रोजी त्याच्या नाकाचा सीटी स्कॅन करण्यात आला आणि नंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर श्वास घेण्याचा त्रास दूर झाला, पण पोटाचा त्रास तसाच होता.
उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू : 26 ऑक्टोबर रोजी एका खासगी अल्ट्रासाऊंड सेंटरमध्ये मुलाच्या पोटाचा अल्ट्रासाऊंड करण्यात आला. त्यात 19 गोष्टी आढळल्या. त्यावर डॉक्टरांनी त्याला रेफर केलं. त्यानंतर मुलाला नोएडा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये त्याच्या पोटात जवळपास 56 वस्तू आढळल्या. कुटुंबीय मुलाला दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात घेऊन गेले. मुलाच्या पोटातील वस्तू बघून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी त्यांचं ऑपरेशन झालं. सर्व वस्तू मुलाच्या पोटातून काढण्यात आल्या. पण स्कॅनिंग केल्यानंतर त्याच्या पोटात पुन्हा तीन वस्तू दिसल्या. 28 ऑक्टोबरच्या रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुलाच्या पोटात या वस्तू गेल्या कशा हे जाणून घेण्यासाठी त्याच्या घशाचा अल्ट्रासाऊंडही करण्यात आला. मात्र, त्याच्या मानेवर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत.
हेही वाचा -