रामनगर (उत्तराखंड): उत्तराखंडमध्ये सातत्यानं अपघात होत आहेत. आज उत्तराखंडमधील अल्मोडा येथे भीषण रस्ते अपघात झालाय. अल्मोडामधील मार्चुला येथील कुपी गावाजवळ बसचं नियंत्रण सुटून बस खोल दरीत कोसळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते. अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला आहे.
उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात प्रवासी बस सुमारे 100 मीटर खोल दरीत कोसळली आहे. अल्मोडा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी या अपघातात आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिलीय. गोळीखल भागातील प्रवाशांना घेऊन ही बस रामनगरला जात होती, अशी माहिती देण्यात आलीय. अपघातग्रस्त बस जीएमओयू म्हणजेच गढवाल मोटर्स ओनर्स युनियन लिमिटेडची आहे.
अपघातस्थळी मदतकार्य सुरू : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केलाय. अपघातातील गंभीर जखमींना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचनाही दिल्यात. अल्मोडा जिल्ह्यातील सॉल्टच्या मार्चुला येथील कुपी गावाजवळ गढवाल मोटर ओनर्स युनियन लिमिटेडची बस खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केलंय. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सणाकरिता अनेक जण त्यांच्या मूळ गावी आले होते. त्यामुळं डोंगरावरील टॅक्सी आणि बसमध्ये प्रवाशांची गर्दी होती. त्यादरम्यान हा भीषण अपघात झाला.
सकाळी अपघात घडला- जखमींना दरीतून बाहेर काढण्यात येतंय. अल्मोडा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विनीत पाल यांनी सांगितलं की, " अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सकाळी 8.30 च्या सुमारास कुपी परिसरात बस दरीत कोसळली."
The Prime Minister has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each deceased in the mishap in Almora, Uttarakhand. The injured would be given Rs. 50,000. https://t.co/KAjq9Agj8i
— PMO India (@PMOIndia) November 4, 2024
मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत : या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. दरम्यान, सीएम धामी यांनी पौरी आणि अल्मोडा संबंधित भागातील एआरटीओ अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून मदत जाहीर केलीय. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
हेही वाचा