ETV Bharat / state

"...तरीही विजय आमचाच, दबावाला बळी न पडता निवडणुकीला सामोरे जाणार"; सदा सरवणकरांचा निर्धार - MAHARASHTA ELECTION 2024

अनेक दिवसांपासून कोणकोणत्या घटना घडल्या आणि आपण निवडणुकीला कसं सामोरे जाणार आहोत. विशेष म्हणजे स्वतः सदा सरवणकर यांनी "ईटीव्ही भारत"ला एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत सविस्तर माहिती दिलीय.

sada Sarvankars
सदा सरवणकर (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2024, 7:24 PM IST

Updated : Nov 5, 2024, 9:24 PM IST

मुंबई : मुंबईतील माहीम मतदारसंघ हा सध्या चर्चेत असलेला मतदारसंघ आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे गटाचे) उमेदवार सदा सरवणकर यांनी इथून उमेदवारी मागे घ्यावी, असा त्यांच्यावर दबाव होता. खुद्द महायुतीतील अनेक नेत्यांनी सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असं म्हटलं होतं. भाजपाचे आशिष शेलार यांनी आमचा सदा सरवणकरांना विरोध नाही. मात्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे जर पहिल्यांदाच निवडणूक लढवत असतील, तर महायुतीचा धर्म म्हणून आपण त्यांना निवडून का आणू नये? असं शेलार यांनी म्हटलं होतं. सदा सरवणकर यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या भेटीस गेले होते, अशा अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अखेर सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मागील अनेक दिवसांपासून कोणकोणत्या घटना घडल्या आणि आपण निवडणुकीला कसं सामोरे जाणार आहोत. विशेष म्हणजे स्वतः सदा सरवणकर यांनी "ईटीव्ही भारत"ला एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत सविस्तर माहिती दिलीय.

...अन्यथा तडजोड झाली असती : सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मी आणि माझा मुलगा समाधान दोघेही वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीस गेलो होतो. त्यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीत निवडणूक लढवायची की अर्ज मागे घ्यायचे याबाबत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तुम्ही राज ठाकरेंना जाऊन भेटा, असे सांगितले. यानंतर राज ठाकरेंना भेटण्यास मी, माझा मुलगा आणि चार पदाधिकाऱ्यांना पाठवले. मात्र राज ठाकरेंनी आमची भेट घेतली नाही. "तुम्हाला जर निवडणूक लढवायची आहे तर लढवा, मला तुमच्याशी बोलायचं नाही," असं राजसाहेब बोलले. त्यामुळं आम्हाला खूप वाईट वाटलं. आमचा अपमान झाला आणि कार्यकर्ते नाराज झाले. जर राज साहेबांनी भेट घेतली असती आणि अर्ज मागे घ्या, असं म्हटलं असतं तर नक्कीच मी अर्ज मागे घेतला असता किंवा तसा काहीतरी विचार केला असता. मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारल्यामुळं मी निवडणूक लढल्यावर ठाम राहिलो. कार्यकर्तेही म्हणाले की, निवडणूक लढवली पाहिजे. शेवटी कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन मी आता निवडणुकीच्या रिंगणात आहे. आता 100 टक्के योगदान देऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं शिवसेना (शिंदे गटाचे) उमेदवार सदा सरवणकर यांनी "ईटीव्ही भारत"ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीनं सदा सरवणकर यांच्याशी संवाद साधला (Source - ETV Bharat Reporter)

मी दबावाला बळी पडलो नाही : मी जेव्हापासून अर्ज दाखल केला, तेव्हापासून महायुतीतील अनेक नेत्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केलाय. तसेच अर्ज मागे घेण्याचं सांगितलं. परंतु माहीम विधानसभा मतदारसंघात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मी मागील 30 वर्षांपासून काम करतोय. मी शिवसेनेचा एक सच्चा कार्यकर्ता आहे. त्यामुळं इथल्या जनतेशी माझी नाळ जुळली आहे आणि जनतेशी आणि कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन मी निवडणूक लढतोय. अर्ज दाखल केल्यानंतर अनेक महायुतीतील नेत्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र मी दबावाला बळी पडलो नाही. आता महायुतीतील आमचे सहयोगी पक्ष मला पाठिंबा देऊन विजय करतील, असा विश्वास असल्याचं सदा सरवणकर यांनी व्यक्त केला.

मला 100 टक्के विजयाची गॅरंटी : पुढे बोलताना सदा सरवणकर म्हणाले की, मी सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि येथील मतांचे समीकरण कसे आहे ते सांगितले. या मतदारसंघात 25 हजार मुस्लिम मतदार आहेत. इथला मतदार मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंना मतदान करणार नाही. कारण मुस्लिम विरोधी भूमिका मनसेनी घेतलीय. त्यामुळं या ठिकणचा मुस्लीम मतदार मनसेवर नाराज आहे. मात्र आता समोर कितीही दिग्गज उमेदवार असला तरी निवडणूक लढवणार आणि 100 टक्के मी विजयी होणार, असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केलाय. मनसेने माहीमला जे मुस्लिम दर्गाचे बांधकाम तोडले, परप्रांतीयांना रेल्वे स्थानकावर केलेली मारहाण इथला मतदार विसरला नाही. त्यामुळं मतदार मनसेला मतदान न करता आम्हालाच मतदान करतील आणि मीच विजयी होणार आहे. मला 100 टक्के विजयाची खात्री आहे, असेही बोलायला सदा सरवणकर विसरले नाहीत.

हेही वाचा

  1. अर्ज मागे घेण्याची मुदत संपली; बीड विधानसभा मतदारसंघातून कोणी घेतली माघार? पाहा लिस्ट
  2. राज्यात कुठल्या बंडखोरांनी मागे घेतले अर्ज? तर, कोण निवडणूक लढवण्यावर ठाम? वाचा सविस्तर

Last Updated : Nov 5, 2024, 9:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.