महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचं 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांना निमंत्रण नाही - PM Modi swearing ceremony - PM MODI SWEARING CEREMONY

PM Modi swearing ceremony : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांना अद्याप निमंत्रण मिळालेलं नाही. मात्र निमंत्रण मिळाल्यास विचार केला जाईल, असं काँग्रेसनं शनिवारी सांगितलं. मोदी तिसऱ्या टर्मसाठी 9 जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यही शपथ घेऊ शकतात.

Rahul Gandhi, Narendra Modi
राहुल गांधी, नरेंद्र मोदी (ETV BHARAT MH Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 10:56 PM IST

नवी दिल्ली PM Modi swearing ceremony : नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभासाठी इंडिया आघाडीला अद्याप निमंत्रण मिळालेलं नाही. निमंत्रण मिळाल्यानंतर त्याबाबत विचार केला जाईल, असं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं.

इंडिया आघाडीला निमंत्रण नाही : जयराम रमेश म्हणाले की, उद्या संध्याकाळी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी केवळ आंतरराष्ट्रीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. विरोधी पक्षनेत्यांना अद्याप निमंत्रण मिळालेलं नाही. इंडिया आघाडीला निमंत्रण मिळाल्यास कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा विचार आम्ही करु, असंही ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितलं की, शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय फक्त इंडिया आघाडी घेईल. त्याचवेळी, त्यांनी राजस्थानमधील त्यांचे सहयोगी राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे नेते हनुमान बेनिवाल यांची नाराजी पूर्णपणे फेटाळून लावलीय.

पंतप्रधान मोदी उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार :मोदींच्या शपथविधी सोहळ्याला श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे प्रवींद कुमार जगन्नाथ, आदी नेत्यांना शपथविधीसाठी आमंत्रित केलं आहे. याव्यतिरिक्त नरेंद्र मोदी यांच्या समारंभाचे निमंत्रण पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड तसंच भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांना पाठवण्यात आलं आहे. पंतप्रधानपदासाठी नामनिर्देशित नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा उद्या संध्याकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यही यावळी शपथ घेणार आहेत.

मंत्रालयांबाबतही चर्चा : गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र या महत्त्वाच्या खात्यांव्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाकडं शिक्षण, संकृतीक खात्याची जबाबदारी असण्याची शक्यता आहे. त्याचवेळी त्यांच्या सह्योगी पक्षांना पाच ते आठ कॅबिनेट पदे दिली जाऊ शकतात. अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांसारख्या नेत्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जात आहे. त्याच वेळी, शिवराज सिंह चौहान, बसवराज बोम्मई, मनोहर लाल खट्टर, सर्बानंद सोनोवाल यांसारखे लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले माजी मुख्यमंत्री मोदी सरकारमध्ये सामील होण्यासाठी प्रमुख दावेदार आहेत.

हे वाचलंत का :

  1. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाबाबत भाजपाचा ठराव, परंतु फडणवीसांचा निर्णय अजूनही गुलदस्त्यातच - Devendra Fadnavsi Resign Issue
  2. शिंदे गटाच्या नेत्यांची बालीश बडबड; शिवसेनेच्या 'त्या' दाव्यावरुन ठाकरे गटाची टीका - Shivsena MPs
  3. कीर्तिकर यांच्या ऐवजी आम्हाला जागा मिळाली असती तर,...; कीर्तिकरांच्या पराभवावर काय म्हणाले नाना पटोले? - Congress Party

ABOUT THE AUTHOR

...view details