महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तामिळनाडूमध्ये भीषण रेल्वे अपघात; प्रवासी रेल्वे मालगाडीला धडकली - TRAIN ACCIDENT IN TAMIL NADU

तामिळनाडूमध्ये भीषण रेल्वे अपघात झालाय. यात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Train Accident in Tamil Nadu
रेल्वे अपघात (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2024, 10:00 PM IST

Updated : Oct 11, 2024, 10:32 PM IST

तामिळनाडू : चेन्नईजवळ भीषण रेल्वे अपघात झाला असून, यात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी रेल्वे ही दुसऱया रेल्वेला धडकली व त्यानंतर बोगींना आग लागली. तसंच काही बोगी रुळावरुन घसरल्या आहेत. म्हैसूर दरभंगा एक्स्प्रेसला तामिळनाडूतील कावरपेट्टाई रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला.

प्रवासी रेल्वे मालगाडीला धडकली : म्हैसूरहून दरभंगा मार्गे पेरांबूरला जाणारी प्रवासी रेल्वे तिरुवल्लूरजवळ कावरपेट्टाई रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला जोरात धडकली. रेल्वे अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले आहेत. तिरुवल्लूर पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. रेल्वे गाही मालगाडीला धडकल्यानं काही बोगींना आग लागली तर काही बोगी रुळावरुन घसरल्या असल्याची माहिती मिळत आहे.

बचावकार्य सुरू : म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसचा अपघात झालाय. अपघातानंतर लगेच बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशामक दल, रेल्वे अधिकारी, जिल्हा प्रशासनाचं अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बोगीला लागली आग : मालगाडी ही रेल्वे स्थानकावर थांबली होती. त्याचवेळी म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेस जोरात आली आणि थांबलेल्या मालगाडीला थडकली. ही धडक इतकी जोरात होती की लगेच काही बोगींना आग लागली व काही बोगी या रुळावरुन घसरल्या. यात अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जीवितहानी नाही :म्हैसूर- दरभंगा रेल्वे क्रमांक १२५७८ (MYS-DBG) चे सहा बोगी मालगाडीला रात्री 09.30 च्या सुमारास धडकल्यानंतर रुळावरून घसरले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही प्रवासी जखमी झालेत. मेडिकल रिलीफ व्हॅन आणि बचाव पथक घटनास्थळावर दाखल झालं असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली.

हेही वाचा -शिर्डीला मिळणार दुसरी 'वंदे भारत', रेल्वे मंत्र्यांचं साई दरबारी आश्वासन - Ashwini Vaishnav Saibaba Darshan

Last Updated : Oct 11, 2024, 10:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details