मुंबई - Umesh Keelu : धारावीसारख्या झोपडपट्टी भागात राहून एका विद्यार्थ्यानं सैन्यदलात अधिकारी होण्याचं स्वप्न साकारलं आहे. सैन्यदलात अधिकारी होण्याकरिता येणाऱ्या अडचणींवर मात करणाऱ्या या विद्यार्थ्यांच सर्वत्र कौतुक केलं जात आहे. उमेश कीलू याचा कोळीवाड्यात जन्म झाला. चेन्नई येथील प्रशिक्षण अकादमीमधून अधिकारी म्हणून रविवारी उत्तीर्ण झाल्यानंतर सर्वत्र उमेश यांच्या संघर्षानंतर मिळविलेल्या यशाची चर्चा सुरू आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीत गरिबीचे चटके सोसणारा उमेश सैन्यदलात अधिकारी म्हणून रुजू होणार आहे.
उमेश कीलूचा संघर्ष : अनेकांना स्वत:चे घर, पुरेसं जेवण आणि मनोरंजनाच्या विविध सुविधा उपलब्ध असतात. मात्र, उमेश कीलू आणि कुटुंबियांना 10 फूट बाय पाच फुटाच्या घरात राहावं लागत होतं. त्यांचे वडील हे पेंटर म्हणून कुटुंबाचं आर्थिक गाडा चालवित होते. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी दोन्ही मुलांना उत्कृष्ट शिक्षण दिलं. दुसरीकडं उमेश यांनं आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही शिक्षणाची जिद्द कायम ठेवली. 2013 मध्ये त्यांच्या वडिलांना पक्षाघाताचा झटका आला. त्यानंतर घराला मिळणारं तुटपुंजे उत्पन्नही थांबले. अशा परिस्थितीतही उमेशनं आयटीमधील पदवी परीक्षा आणि त्यानंतर कॉम्प्युटर सायन्समधील मास्टर्स पदवी मिळवून शिक्षण पूर्ण केलं.
उमेश कीलू भारतीय सैन्यदलात दाखल : शिक्षण सुरू असताना त्यांन एनसीसी एअर विंगमध्ये 'सी' प्रमाणपत्र प्राप्त केलं. एकवेळ शिक्षण आणि दुसरीकडं जबाबदाऱ्या पेलताना कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी सायबर कॅफेमध्ये त्यानं पार्ट टाईम काम सुरू केलं. तिथं कॉम्प्युरेटर ऑपरेटर म्हणून काम करताना प्रचंड परिश्रम आणि दुसरीकडं अभ्यासही सुरू ठेवला. या परिश्रमाचं फलित म्हणून उमेशला टीसीएस या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली. तरीही संघर्ष संपला नव्हता. कंपनीत मिळणाऱ्या वेतनातून कुटुंबाला पुरेसा आधार मिळत नव्हता. वडिलांच्या आजारासाठी पुरेसे पैसे नव्हते. तरीही त्यानं स्पर्धा परीक्षेची तयारी करत सैन्यदलात अधिकारी होऊन वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं.
उमेश कीलू केल्या भावना व्यक्त : सैन्यदलातील अधिकारी झाल्यानं विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळविणं, उच्च शिक्षण घेणं आणि वैविध्य असलेल्या देशात प्रवास करणं शक्य होईल, असा उमेश याचा विश्वास होता, असं सैन्यदलातील अधिकाऱ्यानं सांगितलं. पुढं ते म्हणाले, "सर्व्हिस सलेक्शन बोर्डची परीक्षा 12 वेळा दिल्यानंतर अखेर यश मिळाले. अकादामीत प्रवेश मिळाल्यानंतर काही दिवसात त्याच्या वडिलांचं निधन झालं. धारावीमधील तरुणांना सैन्यदलात नोकरी करण्याकरिता प्रोत्साहन मिळेल, असा उमेशनं विश्वास व्यक्त केला. उमेशनं पुढं म्हटलं, " मला पाहून धारावीमधील तरुणही सैन्यदलात रुजू होतील. त्यांना प्रेरणा मिळेल. अनेकांना आर्थिक अडचणी असतात. मात्र, इच्छा तिथे मार्ग असतो. तुम्हाला विश्वास ठेवून यश मिळवावं लागतो. मला आर्थिक सहकार्य मिळतं नव्हतं. मी शिष्यवृत्ती घेऊन शिक्षण पूर्ण केलं. तीन वर्षे नोकरी करताना स्पर्धा परीक्षेची देखील तयारी केली.
हेही वाचा :
- राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्राणीबरोबर लग्न केल्यानंतर सोमी खाननं दिली प्रतिक्रिया
- भारतीय वंशाच्या दिग्दर्शकाला मिळणार का ऑस्कर? वाचा, ऑस्कर 2024 नामांकनाची संपूर्ण यादी
- कार्तिक आर्यननं 'भूल भुलैया 3'च्या पहिल्या दिवसाच्या शूटची झलक केली शेअर