शिमला Minor Girl Raped By Friend : सोशल माध्यमावर ओळख झालेल्या मित्रानं बालिकेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या नराधमानं बालिकेवर बलात्कार करुन त्याचा अश्लिल व्हिडिओ बनवून बालिकेच्या कुटुंबीयांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेनं केला. या प्रकरणी बालिकेच्या तक्रारीवरुन नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शिमला जिल्ह्यातील रामपूर इथल्या नानखडी पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. विशेष म्हणजे या अगोदर 11 शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याची घटना अद्याप ताजी असताना आता बालिकेवर नराधमानं बलात्कार केल्यानं शिमल्यात खळबळ उडाली.
सोशल माध्यमांवर झाली नराधमाशी ओळख :चार वर्षांपूर्वी या पीडितेची नराधमासोबत सोशल माध्यमावर मैत्री झाली. सोशल माध्यमावर झालेल्या ओळखीतून दोघांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली. दोघांनी मोबाईलवर बराच काळ संवाद केला. जून 2023 मध्ये नराधमानं त्याला शिमला इथल्या थिओग इथं भेटण्यासाठी बोलावलं. यानंतर नराधमानं तिला थिओगच्या पुढं असलेल्या हॉटेलमध्ये नेलं. या हॉटेलमध्ये नराधणानं बालिकेवर बलात्कार केला. यानंतर नानखडी इथल्या राहत्या घरीही त्यानं तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले. 15 जून 2023 रोजी नराधमानं तिला भेटण्यासाठी बोलावलं. इथून आरोपीनं तिला आपल्या घरी नेलं. यावेळी त्यानं तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत तिचा अश्लिल व्हिडिओ बनवला, असा आरोप पीडितेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.