महाराष्ट्र

maharashtra

राजस्थानमधून मुंबई पोलिसांनी भामट्याला केली अटक, पोलीस अधिकाऱ्यांचे खोटे आयडी दाखवून करत होता कोट्यवधींची खंडणी वसूल - Fake police officers ID

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2024, 4:58 PM IST

Fake police officers ID - राजस्थानातील मौलासर आणि मुंबई पोलिसांनी सायबर गुन्हेगार टोळीचा सदस्य अनिल कुमार याच्यावर 4 कोटी 25 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही टोळी बनावट पोलीस अधिकाऱ्याचा आयडी वापरून लोकांची फसवणूक करते. या भामट्याला राजस्थानमध्ये अटक केली आहे. वाचा सविस्तर वृत्त...

मुंबई पोलिसांनी भामट्याला केली अटक
मुंबई पोलिसांनी भामट्याला केली अटक (ETV Bharat Reporter)

कुचामानसिटी (राजस्थान) Fake police officers ID : सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या आव्हानांचा सामना करताना मौलसर आणि मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे बनावट फोटो आयडी देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या एका सायबर गुंडाला अटक केली आहे.

मुंबईतील चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक प्रदीप पाटील यांनी सांगितलं की, या फसवणूक करणाऱ्यानं पोलीस अधिकारी म्हणून मुंबई, महाराष्ट्रातील अनेक लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नोंदवलेल्या अनेक गुन्ह्यांच्या तपासादरम्यान तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करून पोलिसांनी या गुंडाचा माग काढला. अनिल कुमार मुलगा भगीरथ रेगर (वय 23 रा. मौलासर) असं आरोपीचं नाव आहे. त्याला मौलसर पोलिसांच्या मदतीनं अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध चुनाभट्टी पोलीस ठाण्यात कलम 420, 170, 171, 465, 467, 468, 470, 471 IPC आणि 66A, 66D IT कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी करायचा फसवणूक : आरोपी अनिल बनावट आयडीने फोन करून पोलीस अधिकारी असल्याचं सांगत असे. तसंच, "एका मुलीने तुझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. तिच्याशी तुम्ही चुकीच्या पद्धतीनं बोललात. जर तुम्हाला प्रकरण संपवायचं असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील. अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल आणि तुरुंगात जावं लागेल." मौलसर पोलीस ठाण्याचे प्रभारी वीरेंद्र सिंह यांनी सांगितलं की, बनावट पोलीस अधिकाऱ्याच्या ओळखपत्राचा वापर करून मुंबईतील सुमारे ४ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका सदस्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला चुना भट्टी पोलीस ठाण्याच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. घटनेत वापरलेले मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. मुंबई पोलिसांनी आरोपी अनिलला ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा..

  1. ठाण्यात पुन्हा २ वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण करुन लैंगिक अत्याचार, सात महिन्यात २३३ अल्पवयीन मुली नराधमांच्या भक्ष्यस्थानी
  2. एक्स-रे काढण्यासाठी मुलीला काढायला लावले कपडे, घाटी रुग्णालयातील संतापजनक प्रकार; टेक्निशियनला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details