हैदराबाद :मार्गदर्शी चिटफंड या कंपनीच्या १२१ व्या शाखेचं आज गच्चीबावलीत उद्घाटन करण्यात आलं. यावेळी रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक किरण राव यांनी मार्गदर्शीच्या ग्राहकांना उच्च दर्जाच्या सेवा प्रदान करण्याच्या अखंड समर्पणावर प्रकाश टाकला. त्यांनी स्काय सिटी, गच्चीबावली येथे कंपनीच्या 121 व्या शाखेचं उद्घाटन केलं आणि मार्गदर्शीच्या गौरवशाली प्रवासात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
किरण राव यांनी नवीन शाखेतील पहिले ग्राहक जंपनी कल्पना दाम्पत्याला उद्घाटनाची चिट पावती समारंभपूर्वक सुपूर्द केली. या कार्यक्रमाला मार्गदर्शीच्या एम डी शैलजा किरण, रामोजी फिल्म सिटीच्या एम डी विजयेश्वरी, ईटीव्ही भारतच्या संचालक बृहती, सबला मिलेट्सच्या संचालक सहरी, रामोजी राव यांचे नातू सुजय आणि ईटीव्हीचे सीईओ बापिनाडू उपस्थित होते.
ईनाडू तेलंगणाचे संपादक डी एन प्रसाद, ईनाडू आंध्र प्रदेशचे संपादक एम नागेश्वर राव आणि मार्गदर्शीचे सीईओ सत्यनारायण यांच्यासह इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते.
वृद्धी आणि ग्राहक सेवेसाठी वचनबद्धता - यावेळी उद्घाटनासाठी आलेल्यांना संबोधित करताना, किरण राव म्हणाले, “मार्गदर्शी नेहमीच त्यांच्या ग्राहकांच्या पाठीशी उभे राहते. त्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्यात मदत करते. आम्ही प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या चिट पर्यायांची विस्तृत श्रेणी मार्गदर्शीच्या माध्यमातून उपलब्ध करुन देतो. यातून गेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त काळ निर्माण केलेला विश्वास कायम केला आहे.”