महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

का साजरा करण्यात येतो मराठी भाषा गौरव दिन, जाणून घ्या मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिनातील फरक - मराठी भाषा गौरव दिन

Marathi Bhasha Gaurav Din 2024 : जगभरात आज मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Din) साजरा करण्यात येत आहे. मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) या दोन दिवसात (Kavi Kusumagraj) नागरिकांची कायम गल्लत होते. जाणून घेऊया मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिनातील फरक.

Marathi Bhasha Gaurav Din 2024
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 27, 2024, 7:16 AM IST

Updated : Feb 27, 2024, 8:25 AM IST

हैदराबाद Marathi Bhasha Gaurav Din 2024 : जगभरात 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Din) साजरा करण्यात येतो. या दिवशी मराठी भाषेचं महत्व विषद करणारे कार्यक्रम जगभरात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. मराठीतील सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज (Kavi Kusumagraj) उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा (Marathi Bhasha Gaurav Din) करण्यात येतो. विष्णू वामन शिरवाडकर यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेनं मराठी साहित्य विश्वाला अनेक साहित्यकृतींची भेट दिली. त्यामुळं त्यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

कोण होते विष्णू वामन शिरवाडकर :विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म नाशिक इथं 27 फेब्रुवारी 1912 मध्ये झाला होता. त्यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेनं मराठी साहित्याला अनेक दर्जेदार साहित्य दिलं. विष्णू वामन शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज या टोपण नावानं कविता लेखन केलं. त्यांनी जीवन लहरी, जाईचा कुंज, किनारा, मराठी माती, प्रवासी पक्षी, पांथेय, छंदोमयी, अक्षरबाग, चाफा, थांब सहेली, आदी सवितासंग्रह लिहिले आहेत. तर अनेक नाटकं आणि कांदबऱ्याचं लेखनही त्यांनी केलं. त्यांचं नटसम्राट हे गाजलेलं नाटक आजही रंगमंचावर सादर केलं जाते. वि स खांडेकर यांच्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर यांना मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार बहाल करण्यात आला. त्यावरुन त्यांच्या साहित्याची महती स्पष्ट होते.

काय आहे मराठी भाषा गौरव दिनाचा इतिहास :मराठी भाषेला ज्ञानभाषा होण्यासाठी कुसुमाग्रज यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांना मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कारही त्यांच्या साहित्यामुळं प्रदान करण्यात आला. मात्र त्यांचा जन्मदिन मराठी भाषागौरव दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं होतं. विष्णू वामन शिरवाडकर यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्वाचं योगदान दिलं आहे. त्यांच्या या योगदानाचा यथोचित सन्मान म्हणून महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 मध्ये 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचं निश्चित करण्यात आलं. त्यानंतर 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित करण्यात आलं.

काय आहे मराठी भाषा गौरव दिन आणि राजभाषा दिनातील फरक :राज्यात मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यांच्यात नेहमीच गल्लत होते. नागरिकांना हे दोन्ही दिवस एकच असल्याचं सांगितलं जाते. किंवा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचा समज आहे. मात्र मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन हे दोन वेगवेगळे दिन आहेत. विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म दिवस 27 फेब्रुवारी हा दिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 ला होऊनही राज्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला नव्हता. त्यामुळं वसंतराव नाईक सरकारनं मराठी राजभाषा अधिनियम 1964 मांडून तो 11 जानेवारी 1965 ला जाहीर केला. त्या अधिनियमानुसार मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा असेल, असं त्यांनी 1 मे राजी जाहीर केलं. त्यानंतर 1 मे 1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली. त्यामुळं मराठी भाषेला अधिकृत राजभाषेचा दर्जा मिळाल्यानं 1 मे रोजी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येतो.

हेही वाचा :

  1. Marathi Rajbhasha Din 2023 : का केला जातो 'मराठी राजभाषा दिन' साजरा, वाचा सविस्तर
  2. मराठी राजभाषा दिन..! तरुणीने तयार केल्या 'अक्षरांच्या चकल्या'
Last Updated : Feb 27, 2024, 8:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details