महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहारमध्ये कावड यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना; हाय टेंशन वायर डीजेला धडकून नऊ यात्रेकरुंचा मृत्यू - Kanwariyas Died In Vaishali Bihar - KANWARIYAS DIED IN VAISHALI BIHAR

Kanwariyas Died In Vaishali Bihar : बिहारच्या वैशालीमध्ये कावड यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली. कावड यात्रा मिरवणूक सुरू असताना डीजे ट्रॉलीला हाय टेंशन वायर धडकली. यात नऊ जणांचा मृत्यू झालाय.

Kanwariyas Died In Vaishali Bihar
कावड यात्रा दुर्घटना ठिकाण वैशाली बिहार (Source : ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 5, 2024, 6:54 AM IST

Updated : Aug 5, 2024, 8:04 AM IST

बिहार Kanwariyas Died In Vaishali Bihar : वैशालीमध्ये डीजेवर गाणं वाजवत कावड यात्रा जात होती. त्यावेळी हाय टेंशन वायरची धडक डीजे ट्रॉलीला बसली. यावेळी एका लहान बालकासह नऊ कावड यात्रेकरुंचा मृत्यू झालाय. दरम्यान, आठ मृत्यू झाले असल्याची माहिती प्रशासनानं दिली, तर दहा जणांचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत.

कावड यात्रेदरम्यान दुर्घटना : बिहारच्या वैशालीमध्ये कावड यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली. डीजे ट्रॉली ही हाय टेंशन वायरच्या संपर्कात आली आणि करंट बसला. त्यामुळं नऊ कावड यात्रेकरुंचा मृत्यू झाला. या घटनेत दोन यात्रेकरुंची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना वैशालीच्या हाजीपूर इंडस्ट्रियल पोलीस स्टेशन परिसरात घडली. सोनपूर बाबा हरिहरनाथ येथे गंगाजलानं जलाभिषेक करण्यासाठी हे सर्वजण जात होते. यादरम्यान ही दुर्घटना घडली.

एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात जीव गेला : "आठ ते दहा मुलं कावड यात्रेसाठी निघाली होती. दुर्घटना झाली तेव्हा डीजेच्या ट्रॉलीमध्ये चार ते पाच मुलं होती. यादरम्यान मला विजेचा धक्का (करंट) बसला. इतर तरुणांना याची माहिती मिळताच ते सर्वजण वाचवण्यासाठी गेले. त्यामुळं त्यांनाही विजेचा धक्का बसला. घटनास्थळी आठ जणांचा मृत्यू झाला होता तर दोघांचा मृत्यू रुग्णालयात झाला," अशी माहिती स्थानिक सुजित पासवान यांनी दिली.

घटनेच्या अर्ध्या तासानंतर विजेची लाइन कट : स्थानिक लोकांनी सांगितलं की, "घटनेच्या वेळी वीज कार्यालयात फोन केला होता. मात्र, त्यावेळी कोणीही विजेची लाइन कट केली नाही. घटनेनंतर अर्ध्या तासानं लाइन कट करण्यात आली." वीज विभागावर निष्काळजीपणाचा आरोप नागरिकांनी केला. वेळीच लाइन कट केली असती तर जीव वाचू शकले असते, असं स्थानिकांनी सांगितलं.

हेही वाचा -नदीत हिरे शोधण्याकरिता नागरिकांची येथे उडते झुंबड, सत्य काय आहे? - Panna Diamond River Runjh

Last Updated : Aug 5, 2024, 8:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details