महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सत्संगात चेंगराचेंगरी : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये 116 भाविकांचा मृत्यू, मृतांमध्ये 109 महिलांसह 7 मुलांचा समावेश - Hathras Satsang stampede - HATHRAS SATSANG STAMPEDE

Hathras Satsang stampede : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 116 भाविकांचा मृत्यू झाला आहे. याला दुजोरा देताना हाथरसचे पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल यांनी अपघातात सुमारे 116 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाल्याचं सांगितलं.

Hathras Satsang stampede
हातरसमध्ये 60 भाविकांचा मृत्यू झाला (ETV BHARAT National Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 6:09 PM IST

Updated : Jul 2, 2024, 10:27 PM IST

हाथरसHathras Satsang stampede : जिल्ह्यातील कोतवाली सिकंदरराव परिसरात मंगळवारी मोठा अपघात झालाय. रतीभानपूरच्या फुलराई गावात भोले बाबांचा सत्संगानंतर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत महिलांसह लहान मुलं गंभीरपणे चिरडली गेली. त्यामुळं एकच खळबळ उडालीय. या चेंगराचेंगरीत 150 हून भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. 116 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. जखमींनाही एटा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं आहे.

राजेश कुमार सिंह यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT National Desk)

"हाथरस जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातात जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे. माझ्या शोकसंवेदना मृतांच्या कुटुंबांसोबत आहेत. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर करण्यासाठी तसंच योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत" - मुख्यमंत्री, योगी आदित्यनाथ

मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत : मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत सरकारनं जाहीर केलीय. तसंच जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

हातरस अपघाताची प्रत्यक्षदर्शी - ज्योती (ETV BHARAT National Desk)

मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल :अपघाताची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस प्रशासनाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीनं घटनास्थळी पाठवून मदतकार्याला गती देण्याच्या सुचान दिल्या आहेत. तंसच जखमींवर उपचाराची व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सोबतच त्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासोबतच, चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी एडीजी आग्रा तसंच अलीगढचे आयुक्त यांचं एक पथक तयार करण्यात आलं आहे.

मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी घटनास्थळी रवाना :"उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, संदीप सिंह घटनास्थळी रवाना झाले आहेत. त्यांनी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री संदीप सिंह यांनी सांगितलं की, "मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हातरसमधील घटनास्थळी जाण्याचे तसंच सरकारच्या वतीनं आवश्यक निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत."

हे वाचलंत का :

  1. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीकडून मागितली लाच; तलाठी निलंबित - Ladki Bahin Yojana
  2. सभापतींचा निर्णय लोकशाही विरोधी : दावनेंच्या निलंबनावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाना - Uddhav Thackeray targeted Mahayuti
  3. शिवीगाळ प्रकरण तापलं; 'निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत...', प्रसाद लाड यांचा इशारा - Maharashtra Assembly Session 2024
Last Updated : Jul 2, 2024, 10:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details