महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

इमारतीचं काम करताना ढासळला मातीचा ढिगारा; यूपीचा मजूर दगावला, बिहारच्या मजुराला वाचवण्यात यश - Mangaluru Landslide

Mangaluru Landslide : मंगळुरुतील बालमठ इथं मातीचा ढिगारा कोसळून दोन मजूर दबल्याची घटना घडली. या घटनेत एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर एका मजुराला वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 11:32 AM IST

Mangaluru Landslide
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

बंगळुरू Mangaluru Landslide : मंगळुरू शहरातील बालमठ इथल्या इमारतीच्या बांधकामावर मातीचा ढिगारा कोसळून दोन मजूर ढिगाऱ्याखाली दबले होते. या दोन मजुरांपैकी एका मजुराला वाचवण्यात एनडीआरएफ ( NDRF ) आणि एसडीआरएफ ( SDRF ) जवानांना यश आलं. तर एका मजुराला वाचवण्यात बचाव पथकातील जवान अपयशी ठरले. चंदनकुमार असं या ढिगाऱ्याखाली मृत झालेल्या मजुराचं नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा आहे. तर राजकुमार असं बचाव पथकातील जवानांनी वाचवलेल्या मजुराचं नाव आहे. राजकुमार हा बिहारचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बचाव पथकाचं 7 तास रेस्क्यू ऑपरेशन :मंगळुरू शहरातील बालमठ इथं मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन मजूर दबल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या बचाव पथकांनी सात तास रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. या मातीच्या ढिगाऱ्याखालून चंदनकुमारचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं. मात्र दुर्दैवानं बचाव पथक त्याला वाचवू शकलं नाही. तर बिहारच्या राजेशकुमार याला वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं.

मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले होते मजूर :बालमठ इथं मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन मजूर अडकले होते. या मजुरांच्या बचावासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ बचाव पथकानं शोधकार्य सुरू केलं. यात उत्तरप्रदेश इथल्या चंदनकुमार आणि बिहारच्या राजेशकुमार यांचा समावेश आहे. बचाव पथकानं काँक्रीटच्या स्लॅबला खड्डा खोदल्यानंतर चंदनकुमार मातीत अडकलेला आढळला. बुधवारी दुपारी 3.45 च्या सुमारास त्याचा हात स्लॅबमधून दिसला यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. थिम्मय्या आणि पथकानं त्याचे पल्स रेट तपासले. यावेळी त्याच्या रक्तदाबात चढउतार होत होता. त्यानंतर त्याला ड्रीप्सद्वारे ग्लुकोज देण्यात आलं. यावेळी त्याची प्रकृती गंभीर होती. अखेर सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्याचा मृतदेह मातीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं.

इमारतीचं वॉटरप्रूफिंग करताना ढासळला मातीचा ढिगारा :बालमठ इथं इमारतीचं वॉटरप्रूफिंग सुरू असताना अचानक बाजूला असलेला मातीचा ढिगारा कोसळल्यानं हा अपघात झाला. या ढिगाऱ्याखाली चंद्नकुमार आणि राजेशकुमार हे दोन मजूर अडकले. मात्र त्यातील चंदनकुमारला वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं नाही. तर राजेशकुमारचा बचाव करण्यात पथकाला यश आलं. या बचावकार्याच्या वेळी जिल्हाधिकारी मुल्लाई मुगिलन, अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष कुमार, मंगळुरूचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल, पोलीस उपायुक्त सिद्धार्थ गोयल आदी घटनास्थळी उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. Vasai Land Slide : वसईत दरड कोसळून दुर्घटना; चार जणांना काढण्यास यश, बचावकार्य सुरू.
  2. रत्नागिरीतील हरचेरी बौध्दवाडीत जमीन खचली, घरानांही भेगा पडल्याने 9 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना
  3. चांदसेली घाटात दरड कोसळली, आरोग्य केंद्रही बंद... उपचारासाठी जाणाऱ्या महिलेचा पतीच्या खांद्यावरच मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details