सांगारेड्डी Organic Factory Fire : तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात बुधवारी एका फार्मास्युटिकल कंपनीच्या प्लांटमध्ये रासायनिक अणुभट्टीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला. तर 16 जण जखमी झाले आहेत. पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जिल्ह्यातील हथनूर मंडलातील चांदापूर गावात असलेल्या एसबी ऑरगॅनिक्स लिमिटेडच्या कारखान्यात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला आणि आग लागली. मृतांमध्ये फर्मच्या संचालकाचाही समावेश आहे. हे प्लांट हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे 40 किमी अंतरावर आहे.
स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट : फार्मा युनिटच्या आवारात पसरलेली आग काही वेळानंतर आटोक्यात आणण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. या घटनेत जखमी झालेल्या 16 जणांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात हलवण्यात आलंय. यातील दोन जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात पाठवण्यात आलंय. या घटनेत मृत पावलेले कामगार वेगवेगळ्या राज्यातील असून स्फोटाचं कारण शोधलं जातंय.
चार मजूर बिहारमधील : अधिकाऱ्यांनी सांगितलं की घटनेच्या वेळी कारखान्यात 20 लोक होते आणि अधिक कामगार कॉम्प्लेक्समध्ये अडकल्याचं वृत्त फेटाळून लावलंय. या घटनेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंथ रेड्डी, माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि इतर नेत्यांनी कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांमध्ये ऑपरेटर वगळता उर्वरित चार मजूर बिहारमधील आहेत.
मुख्यमंत्री राज्यपालांकडून दुःख व्यक्त : दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी संगारेड्डी कारखान्यातील आग दुर्घटनेचा आढावा घेतलाय. रिॲक्टरच्या स्फोटामुळं आग लागल्याचं अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं बचाव कार्याला गती देण्याचं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आदेश दिले. अपघातात जखमी झालेल्यांना चांगले उपचार देण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तेलंगणाचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आणि पीडितांना सर्व आवश्यक मदत देण्यासाठी राज्य प्रशासनाला त्यांची यंत्रणा एकत्रित करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा :
- संभाजीनगरात 'काळरात्र'! कपड्याच्या दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू - Fire in Sambhajinagar
- Bhiwani Mattress Factory Fire : भिवानीतील गादी कारखान्याला भीषण आग, अनेक किलोमीटरवरुन दिसतोय धुराचा लोट - Fire Incident At Bhiwani