लोकसभा निवडणुकीत रामविलास पासवान यांच्या नावावर आहे 'हा' अनोखा विक्रम पाटणा Lok Sabha Winning Record : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात सुरू आहे. इंडिया आघाडी आणि एनडीएकडून जोरात आपापल्या उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिलला होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या अगोदर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी रेकॉर्ड केले आहेत. काही खासदार संसदेत पाच ते सहा वेळा निवडून गेले आहेत. तर काहींनी आठ वेळा लोकसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. या सगळ्यात रामविलास पासवान यांच्या नावावर अनोखा विक्रम नोंद झाला आहे. तब्बल 9 वेळा लोकसभा निवडणूक जिंकून खासदार होण्याचा विक्रम रामविलास पासवान यांच्या नावावर कोरल्या गेल्या आहे.
रामविलास पासवान यांच्या नावावर अनोखा विक्रम :बिहारच्या राजकारणात रामविलास पासवान यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जाते. त्यांनी तब्बल 9 वेळा लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केला आहे. रामविलास पासवान यांनी हाजीपूर लोकसभा मतदार संघातून 8 वेळा तर रोसरा मतदार संघातून एक वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. रामविलास पासवान यांनी जनता पक्षाकडून 1977 मध्ये हाजीपूर मतदार संघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 1985 मध्ये बिजनौरमधून पोटनिवडणूक लढवली होती. मात्र या पोटनिवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली.
सर्वाधिक वेळा खासदार होण्याचा विक्रम राहणार अबाधित :रामविलास पासवान यांनी बिहारमधून तब्बल 9 वेळा लोकसभा निवडणुकीत यश मिळवलं आहे. त्यांच्यानंतर त्यांचा हा विक्रम कोणी मोडेल, अशी शक्यता फार कमी आहे. रामविलास पासवान यांच्यानंतर जॉर्ज फर्नांडिस आणि जगजीवन राम यांनी आठ वेळा खासदार होऊन विक्रम केला. राधामोहन सिंह यांनीही आतापर्यंत 6 वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. तर यावेळची लोकसभा निवडणूक ते जिंकण्याची शक्यता वर्तवील जात आहे.
तिन्ही विक्रमवीरांचं निधन :बिहारच्या लोकसभा निवडणुकीत रामविलास पासवान, जॉर्ज फर्नांडिस आणि जगजीवन राम या तिघांनी आपल्या नावावर विक्रम केला आहे. मात्र या तिन्ही विक्रमवीरांचं निधन झालं आहे. रामविलास पासवान यांनी तब्बल 9 वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. त्यांचा विक्रम मोडणं आता शक्य वाटत नसल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. तर जगजीवन राम और जॉर्ज फर्नांडिस यांचा विक्रमही मोडणं सहज शक्य नाही, असंही राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केलं आहे. सध्या राधा मोहन सिंह हे सातव्या वेळा लोकसभा निवडणूक जिंकण्याची शक्यता आहे.
काय आहे राजकीय विश्लेषकांचं मत :राजकीय विश्लेषक राजीव रंजन यांनी सांगितलं की, "आपल्या देशातील विविध प्रांतातील काही अशा नेत्यांना जनतेनं आपल्या हृदयात स्थान दिलं. नेत्यांनी नागरिकांच्या सुख-दु:खात सहभाग घेतला, तर जनता त्यांना पुन्हा निवडून आशीर्वाद देईल." तर राजकीय विश्लेषक प्रा अजय झा यांनी, "आता राजकारणातील परिस्थिती बदलली आहे. पूर्वीचे नेते त्यांच्या प्रतिमेमुळे सतत निवडणुका जिंकत. इंद्रजित गुप्ता यांनी 11 वेळा निवडणूक जिंकली होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी अनेकवेळा निवडणूक जिंकली. रामविलास पासवान यांनी तर मोठा विक्रम केला. मात्र आता असा विक्रम होण्याची शक्यता नाही, आता तसा नेताही नाही."
हेही वाचा :
- राहुल गांधी पुन्हा वायनाडमधून लोकसभेच्या मैदानात! लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भरला अर्ज - Rahul Gandhi Files Nomination
- राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाचा वाद; जाहिरातीत 'हा' उल्लेख करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं अजित पवारांच्या गटाला फटकारलं - Sharad Pawar Vs Ajit Pawar
- अरविंद केजरीवालांचं तब्बल 5 किलोनं घटलं वजन; आम आदमी पक्षाचा सरकारवर गंभीर आरोप - Arvind Kejriwal Lost 5 Kg Weight