महाराष्ट्र

maharashtra

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केल्यास करणार बॉम्बस्फोट ; हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांना खलिस्तानवाद्यांची धमकी - Khalistani Gang Threatens To Cm

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 14, 2024, 12:05 PM IST

Updated : Aug 14, 2024, 12:51 PM IST

Khalistani Gang Threatens To Cm : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांना 13 ऑगस्टला खलिस्तानवाद्यांनी धमकी दिली. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केल्यास बॉम्बस्फोट करण्यात येईल, अशी धमकी खलिस्तानवाद्यांकडून देण्यात आली आहे.

Khalistani Gang Threatens To Cm
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

शिमला Khalistani Gang Threatens To Cm : देशभरात भारतीय स्वातंत्र्य दिन 2024 चा उत्साह मोठ्या शिगेला पोहोचला आहे. मात्र हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांना खलिस्तानवाद्यांनी धमकी दिली आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी देहरा इथल्या हुतात्मा भुवनेश डोगरा मैदानावर ध्वजारोहण केल्यास बॉम्ब टाकण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांना खलिस्तानवाद्यांनी धमकी दिल्यानं देशभरात खळबळ उडाली आहे. त्यांच्यासह गाग्रेट इथले काँग्रेस आमदार राकेश कालिया यांनाही मंगळवारी सकाळी त्यांच्या वैयक्तिक क्रमांकावर +447537171504 या क्रमांकावरुन असाच धमकीचा कॉल आला.

स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण केल्यास बॉम्बस्फोट करण्याची धमकी :"हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी किंवा मी स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकावला तर तिथं उपस्थित सगळ्या भारतीयांना ठार करण्याची धमकी दिली. तुमच्या देशाविरोधात युद्ध पुकारण्यात येईल, असंही कॉलरनं सांगितलं. यावेळी कॉलरनं त्याची ओळख सिख फॉर जस्टिस संस्थेचा प्रमुख असल्याचं सांगितंल," असंही काँग्रेस आमदार राकेश कालिया यांनी यावेळी सांगतिलं.

धमकी प्रकरणी दाखल करण्यात आला गुन्हा :हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आमदार राकेश कालिया यांनी आंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलीस ठाण्याचे प्रभारी अंब गौरव भारद्वाज म्हणाले की, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मागील वर्षीही देण्यात आली होती धमकी :खलिस्तानवादी गुरपतवंत सिंग पन्नू यानं मागील वर्षी स्वातंत्र्य दिनापूर्वी अशीच धमकी दिली. शिमला इथल्या ISBT रोडवरील सरकारी कार्यालय आणि धर्मशाला तपोवन विधानसभेच्या बाहेर खलिस्तानी पोस्टर्स पोलिसांना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. देहरा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांचा आहे. कमलेश ठाकूर यांनी तिथून विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या होश्यार सिंह यांचा पराभव करून विजय मिळवला. निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी देहरा इथं राज्यस्तरीय स्वातंत्र्यदिन कार्यक्रम आयोजित करण्याचं आश्वासन दिलं.

हेही वाचा :

  1. Khalistan Support Slogan In Dharamshala : धर्मशालामध्ये विश्वचषक सामन्यापूर्वी खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा
  2. Threat to CM Dhami: शिखर परिषदेबाबत मुख्यमंत्री धामी यांना धमकी, पोलीस झाले सतर्क
Last Updated : Aug 14, 2024, 12:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details