नवी दिल्ली Arvind Kejriwal resigns : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लेफ्टनंट नायब राज्यपाल व्ही के राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिला आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार आतिशी आणि आम आदमी पार्टीचे (आप) ज्येष्ठ नेतेही यावेळी उपस्थित होते. केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला, तर आतिशी यांनी नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला.
तासभर चालली आप नेत्यांची बैठक : दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी सोमवारी बैठक झाली. या बैठकीत सगळे आमदार तसंच विद्यमान कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर सौरभ भारद्वाज यांनी माध्यमांना बैठकीची माहिती दिली. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांबाबत बैठकीत उपस्थित प्रत्येक नेत्याशी चर्चा केली. आपच्या नेत्यांची त्यांनी यावेळी मतं आजमावली. यावेळी दिल्लीसह इतर राज्यांमध्ये आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या परिस्थितीचा आढावाही घेण्यात आला.
Delhi | AAP leader and proposed CM Atishi stakes claim to form the new government before Delhi LG VK Saxena. pic.twitter.com/4wrEN3o2gY
— ANI (@ANI) September 17, 2024
आतिशी मुख्यमंत्री पदाच्या प्रमुख दावेदार : दिल्ली दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल हे कारागृहात असताना मंत्री आतिशी यांनी मोठ्या उत्साहानं सरकारची बाजू लावून धरली होती. त्यांनी सरकारचं कामकाजही चांगल्या पद्धतीनं हाताळलं. त्यासह आतिशी यांनी वेळोवेळी आम आदमी पार्टीची बाजू लावून धरत अरविंद केजरीवाल यांना जोरदार पाठिंबा दिला. 15 ऑगस्ट रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ध्वजारोहणासाठी आतिशींचं नाव पुढं केलं होतं. तेव्हाच आतिशी या अरविंद केजरीवाल यांच्या उत्तराधिकारी होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार आजही त्याचा प्रत्यय आला. केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनीच नियमानुसार नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तसंच त्या आता लवकरच दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
हेही वाचा..