ETV Bharat / bharat

अरविंद केजरीवाल यांचा उत्तराधिकारी ठरला : आतिशी होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री, थोड्याचं वेळात घोषणेची शक्यता - Atishi Will Be Next CM Of Delhi - ATISHI WILL BE NEXT CM OF DELHI

Atishi Will Be Next CM Of Delhi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर दिल्लीचं पुढचं मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत मंत्री आतिशी मार्लेना यांच्या नावावर शिक्कामोर्जब करण्यात आलं आहे. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची माळ आतिशी यांच्या गळ्यात पडणार असल्याचं निश्चित झालं आहे.

Atishi Will Be Next CM Of Delhi
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 11:52 AM IST

Updated : Sep 17, 2024, 12:57 PM IST

नवी दिल्ली Atishi Will Be Next CM Of Delhi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घोषित केला आहे. त्यांनी राजीनामा घोषित केल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार याची मोठी चर्चा सध्या सुरू आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मंत्री आतिशी मार्लेना, सुनीता केजरीवाल आणि राघव चड्डा यांची नावं आघाडीवर आहेत. मात्र या चर्चेत मंत्री आतिशी मार्लेना यांच्या नावावर आमदारांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे थोड्याच वेळात दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.

Atishi Will Be Next CM Of Delhi
पत्र (ETV Bharat)
अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा: आतिशी होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री, थोड्याचं वेळात घोषणेची शक्यता (ETV Bharat)

मंत्री आतिशी होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री : आज झालेल्या आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ गटाची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत आम आदमी पार्टीच्या नेत्या तथा मंत्री आतिशी यांच्या नावावर सगळ्या आमदारांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतिशी या अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यामुळेच अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याकडं तब्बल 5 विभागाचा पदभार सोपवला होता.

Atishi Will Be Next CM Of Delhi
अरविंद केजरीवाल (ETV Bharat)

अरविंद केजरीवाल राज्यपालांकडं सोपवणार राजीनामा : आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज सकाळी आयोजित करण्यात आली. या बैठकीत सर्व आमदारांनी आपलं मत मांडलं. आमदारांनी आतिशी यांच्या नावावर एकमत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या आमदारांनी शिक्कामोर्तब केलेल्या नेत्याची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात येईल. यानंतर अरविंद केजरीवाल नायब राज्यपाल यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर करणार आहेत.

Atishi Will Be Next CM Of Delhi
आतिशी मार्लेना (ETV Bharat)

तासभर चालली आप नेत्यांची बैठक : दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी सोमवारी पीएसीची झाली. या बैठकीत सगळे पीएसी सदस्य आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर सौरभ भारद्वाज यांनी माध्यमांना बैठकीची माहिती दिली. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांबाबत बैठकीत उपस्थित प्रत्येक नेत्याशी चर्चा केली. आपच्या नेत्यांचा त्यांनी अभिप्राय घेतला. यावेळी दिल्लीसह इतर राज्यांमध्ये आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

Atishi Will Be Next CM Of Delhi
सुनिता केजरीवाल (ETV Bharat)

आतिशी मुख्यमंत्री पदाच्या प्रमुख दावेदार : दिल्ली दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल हे कारागृहात असताना मंत्री आतिशी यांनी मोठ्या उत्साहानं सरकारची बाजू लावून धरली. त्यांनी सरकारचं कामकाजही चांगल्या पद्धतीनं हाताळलं. त्यासह आतिशी यांनी वेळोवेळी आम आदमी पार्टीची बाजू लावून धरत अरविंद केजरीवाल यांना जोरदार पाठिंबा दिला. 15 ऑगस्ट रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ध्वजारोहणासाठी आतिशीचं नाव पुढं केलं होतं. तेव्हाच आतिशी या अरविंद केजरीवाल यांच्या उत्तराधिकारी होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.

Atishi Will Be Next CM Of Delhi
सौरव भारद्वाज (ETV Bharat)

हेही वाचा :

  1. अरविंद केजरीवालांच्या आणखी एका मंत्र्याला नोटीस; भाजपानं केली होती निवडणूक आयोगाकडं तक्रार - Election Commission Notice to AAP
  2. पाण्यासाठी जल सत्याग्रह : जलमंत्री आतिशींची प्रकृती खालावली, रुग्णालयात केलं दाखल - AAP Leader Atishi Hospitalized
  3. आपच्या आणखी चार नेत्यांना अटक होणार, भाजपाकडून मला ऑफर... आतिशी यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप - Aap minister Atishi

Last Updated : Sep 17, 2024, 12:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.