Kapil Sibal on EVM Hack :लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुमारे दोन आठवड्यांनंतर देशात ईव्हीएम हॅकिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ईव्हीएमबाबत कपिल सिब्बल म्हणाले, ''जेव्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे की, आपण आमच्या मशीनवर आणि भारतीय निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला पाहिजे. जर सर्वोच्च न्यायालयाचं त्यांच्यावर विश्वास ठेवत असेल, तर मी त्यांच्यावर टिप्पणी करण्याची काय गरज आहे? सरकार आणि मशीन्सवर विश्वास ठेवायला लागलो तर सगळी कामं मशिनच्या माध्यमातून व्हायला हवीत. मग न्यायालयं का आहेत? असा सवाल त्यांनी केलाय.
कपिल सिब्बल यांची विरोधकांना सूचना :कपिल सिब्बल पुढे म्हणाले की, ''ईव्हीएमच्या विश्वासार्हतेचा मुद्दा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला पाहिजे. या विषयावर 'तपशीलवार चर्चा' होणं आवश्यक आहे. या अधिवेशनात राष्ट्रपतींचं अभिभाषण होईल, त्यानंतर त्यावर चर्चा होईल. निवडणुका नीट झाल्या नाहीत तर आपली लोकशाही धोक्यात येईल. विरोधकांनी चर्चा करायला करावी.''
मतदानात फेरफार होऊ शकतो कारण... :महाराष्ट्रातील गोरेगाव येथील मतमोजणी केंद्रात शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकानं मोबाईल फोन घेतल्याच्या वृत्तावर कपिल सिब्बल म्हणाले की, ''ही बाब 'बॅलेट पेपरद्वारे इलेक्ट्रॉनिक मतदाना'शी संबंधित आहे. त्याचा ईव्हीएमशी थेट संबंध नाही. हे बॅलेट पेपरद्वारे इलेक्ट्रॉनिक मतदानाविषयी आहे. इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका मतदान प्रणालीद्वारे मतदानात फेरफार होऊ शकतो. कारण ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नियंत्रित असतात. इलेक्ट्रॉनिक बॅलेट सिस्टम 85 वर्षांवरील वृद्ध लोक मतदान करू शकतात. जर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 1000-1500 मतं असतील, तर 10 विधानसभा मतदारसंघात एकूण 10,000 मतं असू शकतात. यामध्ये फेरफार होऊ शकतो. कारण इलेक्ट्रॉनिक बॅलेट मतदान प्रणाली इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं नियंत्रित केली जाते. ही बाब ईव्हीएमपेक्षा वेगळी आहे."