हैदराबाद Kalki 2898 AD: 'कल्की 2898 एडी' प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धमाका पाहायला मिळत आहे. 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला. हा सिनेमा मुंबईत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसत आहे. "फर्स्ट डे फर्स्ट शो" बघितल्यानंतरदेखील पुन्हा सायंकाळी पाहण्यासाठी आल्याचं एका चाहत्यानं ईटीव्ही भारती बोलताना सांगतिलं आहे. तब्बल 39 वर्षानंतर अमिताभ बच्चन आणि कमल हासन या चित्रपटात एकत्र आल्यांनं चाहते खूश आहेत. चाहत्यांनी पहिल्याच दिवशी चित्रपट बघण्याकरता रांगा लावल्या आहेत. पहिल्याच दिवशी चित्रपटाचे शो हाऊसफुल पहायला मिळाले.
बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये जुळते सूत:बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये सूत जुळल्याचे दिसून येते. एकमेकांशी संबंध न ठेवणाऱ्या या फिल्म इंडस्ट्रीज आता हातात हात घालून कामं करू लागल्या आहेत. बॉलिवूडच्या चित्रपटांत दाक्षिणात्य सिनेमातील पॉप्युलर कलाकार आणि साऊथच्या फिल्म्समध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथितयश कलाकार घेतले जात आहेत. या चित्रपटांना पॅन-इंडियाचा दर्जा दिला असून त्यामुळे बॉक्स ऑफिसच्या मिळकतीवर पॉझिटिव्ह परिणाम झालेला दिसतोय. गुरुवारी प्रदर्शित झालेला चित्रपट कल्की 2898 AD हे ताजे उदाहरण आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, प्रभास, कमल हासन, दीपिका पदुकोण आदी कलाकार काम करीत आहेत.