महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झारखंडचे मंत्री तथा कॉंग्रेस नेते आलमगीर आलम यांना ईडीनं केली अटक; नेमकं प्रकरण काय? - Minister Alamgir Alam arrested - MINISTER ALAMGIR ALAM ARRESTED

Alamgir Alam Arrested by ED : झारखंडचे ग्राम विकास मंत्री तथा कॉंग्रेस नेते आलमगीर आलम यांना अटक करण्यात आलीय. दोन दिवसांच्या चौकशीनंतर ईडीनं ही कारवाई केलीय.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 8:08 PM IST

रांची Alamgir Alam Arrested by ED : झारखंड सरकारमधील मंत्री आलमगीर आलम यांना ईडीनं अटक केलीय. त्यांच्या ओएसडी आणि नोकराच्या घरातून मोठी रोकड जप्त केल्याप्रकरणी ईडीनं त्यांच्यावर ही कारवाई केलीय.

चौकशीनंतर केली अटक : काही दिवसांपूर्वी झारखंड सरकारमधील मंत्री तथा कॉंग्रेस नेते आलमगीर आलम यांच्या ओएसडी आणि नोकराच्या घरातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले होते. त्यामुळं गेल्या दोन दिवसांपासून ईडी त्यांची चौकशी करत होती. मंगळवारीही ईडीनं त्यांची सुमारे नऊ तास चौकशी केली होती. त्यानंतर आजही ईडीनं चौकशीसाठी त्यांना बोलावलं होतं. चौकशी दरम्यान त्यांना अटक करण्यात आली.

छाप्यात मिळाले कोट्यवधी रुपये रोख : 6 मे रोजी ईडीनं आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांचा घरगुती नोकर जहांगीर आलम याच्या घरावर छापा टाकला होता. या छाप्यात त्यांना कोट्यवधी रुपये रोख मिळाले होते. यानंतर संजीव लाल आणि जहांगीर आलम यांना अटक करण्यात आली होती.

कोण आहेत आलमगीर आलम : काँग्रेस नेते आणि पाकूरचे आमदार आलमगीर आलम हे झारखंड सरकारमध्ये ग्राम विकास मंत्री आहेत. ग्राम विकास विभागाचे माजी मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात सुरू असलेल्या तपासासंदर्भात ईडीनं छापा टाकला होता. त्यांना गेल्या वर्षीच अटक करण्यात आली होती.

चंपाई सोरेन सोबत घेतली होती शपथ : माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यानंतर झारखंडमध्ये स्थापन झालेल्या नव्या चंपाई सोरेन सरकारमध्ये आलमगीर आलम यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची चर्चा होती. त्यांनी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यासोबत शपथ घेतली. मात्र, चंपाई मंत्रिमंडळात काँग्रेसच्या कोट्यातून जुन्या चेहऱ्यांची पुनरावृत्ती झाल्यानं पक्षनेतृत्वाविरोधात आमदारांमध्ये तीव्र नाराजी होती. पक्षाचे आमदार यावेळी मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या काँग्रेसच्या कोट्यातील सर्व चेहरे बदलण्याची मागणी करत होते. त्यामुळं त्यांना ग्राम विकास मंत्री बनवण्यात आलं होतं.

हेही वाचा :

  1. झारखंडमधील कंपनीची ५ कोटी ८९ लाखांची फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - EMMAR EMPLOYEES PRIVATE LIMITED
  2. झारखंडमधील सत्तासंकट सुटेना! सत्ताधारी आघाडीचे 40 आमदार हैदराबादमधील रिसॉर्टमध्ये ठोकणार तळ

ABOUT THE AUTHOR

...view details