नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येक जण विधानसभा निवडणूक निकालाची (Jammu Kashmir Assembly Election)आतुरतेनं वाट पाहतंय. याचं कारण म्हणजे, इथं 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका झाल्या असून दुसरं म्हणजे जम्मू-काश्मीरला सहा वर्षांनी मुख्यमंत्री मिळणार आहे. जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झालं. तर जम्मू आणि काश्मीरसाठी एक्झिट पोलचे निकाल (Jammu Kashmir Exit Poll Result) काय सांगतात ते जाणून घेऊया.
- 'ॲक्सिस माय इंडिया'चा एक्झिट पोल : ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलच्या निकालानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-एनसी युतीला 35-45 जागा मिळतील. तर भाजपाला 24-34 जागा मिळू शकतात. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीडीपीला 4-6 जागा मिळतील. इंजिनियर रशीद यांच्या एआयपी पक्षाला 3-8 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
- 'पीपल्स पल्स'चा एक्झिट पोल :'पीपल्स पल्स'च्या एक्झिट पोलनुसार, नॅशनल कॉन्फरन्स जम्मू आणि काश्मीरमध्ये 33-35 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याची अपेक्षा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स युतीला 46-50 जागा मिळण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीरसाठी 'पीपल्स पल्स'चा अंदाज
- राष्ट्रीय परिषद - 33-35
- भाजपा - 23-27
- काँग्रेस - 13-15
- पीडीपी - 7-11
- इतर - 4-5
- इंडिया टुडे-सी-व्होटर एक्झिट पोल परिणाम :इंडिया टुडे आणि सी-व्होटर एक्झिट पोल डेटानुसार, भाजपाला जम्मू विभागातील 43 जागांपैकी 27-31 जागा मिळू शकतात. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला 11-15 तर पीडीपीला दोन जागा मिळू शकतात.