श्रीहरिकोटा ISRO SSLV-D3 EOS-08 Mission : इस्रोनं शुक्रवारी EOS-8 नावाचं बेबी रॉकेट इमेजिंग सॅटेलाइटबरोबर लॉच केलं. सकाळी 9 वाजून 17 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. यावेळी हजारोंच्या संख्येनं नागरिक आणि विद्यार्थी श्रीहरिकोटा येथे हजर होते.
सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण : इस्त्रोनं दिलेल्या माहितीनुसार, 'स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल -03' (SSLV D3) च्या तिसऱ्या अंतिम विकासात्मक उड्डाणावर पृथ्वी उपग्रहाच्या पक्षेपणाची सुरुवात झाली. स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलचं पहिलं प्रक्षेपण 2022 साली अयशस्वी ठरलं होतं. मात्र, फेब्रुवारी 2023 मध्ये दुसरं प्रक्षेणपण यशस्वी झालं. दुसऱ्या मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता तिसऱ्या टप्प्याचं प्रक्षेपण यशस्वी झालं आहे.
रॉकेट 34 मीटर उंच आणि 120 टन वजन : EOS -8 हा असा सॅटेलाइट आहे, ज्यात भविष्यातील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. तंत्रज्ञानाच्या गरजांना लक्षात घेऊन इस्रोनं 'एसएसएलव्ही' विकसित केलं. हे रॉकेट 34 मीटर उंच असून, 120 टन वजन आहे. तसंच रॉकेट पृथ्वीपासून सुमारे 350-400 किलोमीटर वर लो-अर्थ ऑर्बिटमध्ये 500 किलोग्राम वजनाचे सॅटेलाइट वाहून नेऊ शकतं. हा एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करणं आणि महत्वाची माहिती गोळा करणं हे याचं उद्दिष्ट आहे.