अहमदाबाद Iranian Boat Caught off Gujarat Coast : गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं मंगळवारी भारतीय नौदल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांच्या संयुक्त कारवाईत गुजरातच्या किनारपट्टीवर संशयित इराणी बोट पकडली. या बोटीतून 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचं चरस आणि इतर अंमली पदार्थ बाळगणाऱ्या त्या बोटीच्या चार इराणी सदस्यांना ताब्यात घेतल्याची माहिती एका सूत्रांनी दिली.
3300 किलो अंमली पदार्थ जप्त : गुजरात एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं अंमली पदार्थांच्या बाबत माहिती दिली. ते म्हणाले की, "समुद्रात करण्यात आलेल्या कारवाईत बोटीतून चरससह विविध प्रकारच्या अंमली पदार्थांची मोठी खेप जप्त करण्यात आलीय. ही बोट किनाऱ्याच्या दिशेनं आणली जात असून आज पोरबंदरला पोहोचण्याची शक्यता आहे. अंदाजे 1,000 कोटी रुपयांचे 3300 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पत्रकार परिषद घेऊन अधिकृत तपशील जाहीर करेल." याप्रकरणी गुजरात एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, "समुद्राच्या मध्यभागी केलेल्या कारवाईदरम्यान बोटीतून मोठ्या प्रमाणात चरससह विविध अंमली पदार्थ जप्त करण्यात आलंय."