हैदराबादJewellery theft in running train -धावत्या रेल्वेत दागिन्यांची चोरी करणाऱ्या महाराष्ट्रातील तीन महिला गुन्हेगारांच्या आंतरराज्य टोळीला अटक करण्यात आलीय. त्यांच्याकडून ५ लाख रुपये किमतीचे ७८ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. हैदराबाद रेल्वे पोलीस अधिकारी बी. प्रवीण कुमार यांच्यासह गुन्हे पथक आरएचसी नरसिंग राठोड, आरपीसी शकील पाशा यांनी ३ आरोपींना अटक केली. त्यांची चौकशीत करण्यात येत आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपी महिला महाराष्ट्र राज्यातील सोलापूरच्या आहेत. सुरुवातीला त्या विविध ठिकाणांहून जुने कपडे खरेदी करत असतात आणि त्यांच्या स्थानिक बाजारात विकत होत्या. मात्र त्यांच्या अशाच भेटीदरम्यान त्यांची एका महिला गुन्हेगाराशी मैत्री झाली. त्यानंतर त्यांनी चालत्या ट्रेनमधील महिला प्रवाशांकडून आणि ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांकडून कशी चोरी करायची याचं त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं. तसंच चोरी करुन पळ कसा काढायचा हेही त्यांना शिकवण्यात आलं. त्यानंतर त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्या धावत्या गाड्यांमध्ये अशा प्रकारच्या चोऱ्या करु लागल्या होत्या.
या कारवाईत पकडलेल्या महिलांमध्ये रेणूका जाधव, वय 37 वर्षे रा सोनकाडे वस्ती होटगी, अनु देवा जाधव, वय 38 वर्षे, सोलापूर, सीताबाई शवरप्पा गायकवाड,वय 49 वर्षे, सोलापूर यांचा समावेश आहे. हैदराबादच्या लिंगमपल्ली रेल्वे स्टेशनवर त्यांना पकडण्यात आल्याची माहिती हैदराबाद रेल्वे पोलिसांनी आज दिली. या महिलांच्या कडून त्यावेळी २ सोन्याच्य साखळ्य जप्त करण्यात आल्या. २० ग्रॅम सोन्याच्या या साखळ्या होत्या. त्याचबरोबर २५ ग्रॅमचा आणखी एक दागिना तसंच १० ग्रॅमची आणखी एक सोन्याची चेन त्यांच्याकडे मिळून आली. त्याचबरोबर एकूण २० ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या असा एकूण सुमारे 78 ग्रॅम वजन सोन्याचा मुद्देमाल त्यांच्याकडे मिळून आला. त्याची किंमत ५ लाख रुपये आहे. या महिला इतरही अनेक चोरीच्या प्रकरणात अडकलेल्या असण्याची शक्यता आहे. त्याना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून, इतरही चोऱ्यांची माहिती त्यांच्याकडून मिळण्याची शक्यता आहे.
सिकंदराबाद डीएसपी एस. के. रेल्वे पोलीस जावेद बी. प्रवीण कुमार, नरसिंग राठोड, शकील पाशा, तसंच महिला पोलीस कर्मचारी भाग्यम्मा, यमुना, थारा , डी. स्वरूपा यांनी ही कारवाई केली. त्यांना ADG रेल्वे, महेश भागवत तसंच रेल्वेच्या एसपी शेख सलीमा यांनी मार्गदर्शन केलं.
हे वाचलंत का...
- 2 किलोमीटरचा रस्ताच गेला चोरीला; पोलीसही चक्रावले!
- हरवलेले-चोरी गेलेले मोबाईल फोन सापडतात, रेल्वे पोलिसांनी चोरीचे 150 मोबाईल केले जप्त
- माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या घरी चोरी, दोन नोकरांवर गुन्हा दाखल