International Yoga Day:आज संपूर्ण देशात आणि जगात 10 वा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगरमध्ये डल तळ्याच्या किनारी सात हजार लोकांसह योगासनं केली. जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे. श्रीनगरमध्ये प्रत्येक नाक्यावर, गल्लीबोळात पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आलाय. शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) येथे योग दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुमारे 7 हजार लोकांनी योग केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2015 पासून 'योग दिन' साजरा करत आहेत. दिल्ली, चंदीगड, डेहराडून, रांची, लखनौ, म्हैसूर येथे त्यांनी 'योग दिन' योगासनं करत साजरा केला. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातही त्यांनी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा केला आहे.
योगासनांमुळं आपल्याला शक्ती मिळते :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये तरुणांना संबोधित करताना सांगितलं की, ''योगासनांमुळे आपल्याला शक्ती मिळते. जगभरात लोक योग करत आहेत. योग फक्त विद्या नाही, विज्ञान आहे. काश्मीरच्या भूमीवरून मी लोकांना 'आंतरराष्ट्रीय योग दिना'च्या शुभेच्छा देतो."
योग शिकण्यासाठी लोक भारतात येतात : पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी प्रत्येकाला योगासनं आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन करतो. पंतप्रधान जगभरातून लोक योग शिकण्यासाठी भारतात येत आहेत. लोक फिटनेससाठी पर्सनला योग ट्रेनर ठेवत आहेत. योगासनांमुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. भारतात मूळ असलेल्या योगविद्येचा जगभरात प्रचार आणि प्रसार होत आहे.
हेही वाचा
- यूजीसी नेट परीक्षा रद्द : जाणून घ्या, पेपर फुटी विरोधी कायदा काय सांगतो? किती होऊ शकते शिक्षा? - Anti Paper Leak Law
- अरविंद केजरीवाल यांना जामीन : दारू घोटाळ्यात मोठा दिलासा; ईडीची स्थगितीची मागणीही फेटाळली - Arvind Kejriwal Gets Bail
- रशिया-युक्रेन युद्ध थांबवणाऱ्या मोदींना पेपर लीक का थांबवता आलं नाही; भाजपाचा शैक्षणिक संस्थांवर कब्जा - राहुल गांधी - Rahul Gandhi on NEET