हैदराबाद Day Against Drug Abuse and Illicit Trafficking: दिवसेंदिवस तरुणाई अंमली पदार्थांच्या विळख्यात जात आहे. फुटपाथ, चहाची टपरी, रेल्वे प्लॅटफॉर्मवर अनेक तरुण आपल्याला अमली पदार्थ सेवन करताना दिसतात. ज्यांच्याकडे धड खायलाही पैसे नाहीत अशी मुलंदेखील व्यसन करतात. यात महिलाही मागे नाहीत. वैयक्तिक, सामाजिक जीवनातील ताणतणाव, प्रेमप्रकरण, वैवाहिक जीवन आणि घटस्फोट आदी कारणांमुळे महिलांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. याला आळा घालण्याकरिता तसच अमली पदार्थांचे व्यसन आणि तस्करी रोखण्याकरिता दरवर्षी २६ जून रोजी 'आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन' साजरा केला जातो.
इतिहास आणि महत्व: ७ सप्टेंबर १९८७ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने एक ठराव मंजूर केला. तेव्हापासून दरवर्षी २६ जून रोजी हा दिवस साजरा केला जातो. जगभरातील लहान मुळे आणि किशोरवयीन मुलांमध्ये अंमली पदार्थांचे व्यसन तसचं तस्करी रोखणे या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. अमली पदार्थाची तस्करी खण्यासाठी भारतातही कडक कायदे आहेत. परंतु लोकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे जगजागृती करणे फार महत्वाचे आहे.
- यावर्षीची थीम: दरवर्षी वेगवेगळ्या थीमवरनुसार हा दिवस साजरा केला जातो. 'पुरावा स्पष्ट आहे: प्रतिबंधात गुंतवणूक करा' ही अमली पदार्थ पदार्थ विरोधी दिन 2024 ची थीम आहे.
- मानवी तस्करीत तेलंगणा प्रथम:एनसीआरबी २०१६ पासून देशभरातील मानवी तस्करी विरोधी युनिट्सकडून मानवी तस्करी प्रकणाचा डेटा गोळा करत आहे. सन २०२२ मध्ये मानवी तस्करीची २२५० प्रकरणे नोंदविण्यात आली आहे. यात तेलंगणामध्ये सर्वाधिक ३९१ प्रकरणं, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर २९५ आणि बिहार तिसऱ्या स्थानावर आहे. तेथे २६० प्रकरणांची नोंद करण्यात आलीय.