महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पर्यटन वाढवण्यासाठी सरकारचा 'धमाका'; लक्षद्वीप बेटांसह स्पिरिच्युअल पर्यटनाचा करणार विकास

Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी भारतीय बेटांचा विकास करणार असून लक्षद्वीप बेटांचा यात समावेश करणार आहे. त्यासह अध्यात्मिक पर्यटनास चालना देण्यात येणार आहे.

Interim Budget 2024
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 2:07 PM IST

हैदराबाद Interim Budget 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावरुन भारतीय लक्षद्वीप बेट आणि मालदीवच्या पर्यटनावरुन चांगलंच राजकारण रंगलं होतं. मात्र आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अंतरिम आर्थसंकल्पात भारताच्या विविध बेटांचा विकास करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यात भारत सरकार लक्षद्वीप बेटांचाही विकास करणार आहे. आता भारत सरकार आपल्या बेटांचा विकास करुन पर्यटन वाढवण्यावर भर देत असल्याचं स्पष्ट झालं आहे. लक्षद्वीप बेटांवर पर्यटन आणखी वाढणार आहे. त्यासह अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अध्यात्मिक पर्यटन वाढीवरही भर देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

लक्षद्वीप बेटांचा करणार विकास :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात भारतीय बेटांचा विकास करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निधीची तरतूद केली आहे. त्यामुळं आता भारतीय बेटांवर पर्यटन वाढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

लक्षद्वीप बेट समूहांवर केवळ 10 बेटांवर मानवी वस्ती :लक्षद्वीप बेट समूह हा भारतीय बेटांचा पर्यटनासाठी महत्वाचा बेटसमूह आहे. लक्षद्वीप याचा अर्थ लाखोंचा बेट समूह असा त्याचा अर्थ होतो. मात्र प्रत्यक्षात या बेट समूहात केवळ 36 बेटे आहेत. त्यातील केवळ 10 बेटांवर मानवी वस्ती आहे. त्यातील केवळ काही बेटांवरच सामान्य व्यक्तीला जाता येते. तर अंदमान निकोबार या बेटांचाही विकास करण्यात येणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटं ही सगळ्यात मोठी बेटं मानली जातात. अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर ही चेन्नई, कोलकात्ता आणि विशाखापट्टणम या शहराशी जोडली गेलेली आहेत.

अध्यात्मिक पर्यटनास देणार चालना :केंद्रीय अर्थमंत्री निरमला सीतारामन यांनी पहिल्यांदा अर्थसंकल्पात अध्यात्मिक पर्यटनास चालना देण्यासाठी निधीची तरतूद केल्याचा दावा करण्यात येत आहे. अयोध्येत आताच राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. त्यामुळं देशातील वातावरण मोठ्या प्रमाणात धार्मिक झालं आहे. त्यातच आता केंद्रीय अर्थसंकल्पात धार्मिक पर्यटनसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं देशातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्रांचा मोठ्या प्रमाणत विकास होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा :

  1. Union Interim Budget 2024 : अर्थसंकल्प अन् निर्मला सीतारामन यांच्या वेगवेगळ्या साड्या; चर्चा तर होणारच!
  2. अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे नक्की काय रं भाऊ? अर्थसंकल्प आणि अंतरिम अर्थसंकल्पातील फरक घ्या जाणून...

ABOUT THE AUTHOR

...view details