महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कठुआमध्ये सैनिकांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, चार जवानांना वीरमरण - Terror Attack On Indian Army

Terror Attack On Indian Army : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांच्या ताफ्यावर गोळीबार केला. यात दोन जवान जखमी झाले आहेत. तर चार जवानांना वीरमरण आलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर जवानांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

Indian Army Convoy Attacked
दहशतवादी हल्ला (ETV BHARAT HINDI DESK)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 8, 2024, 5:48 PM IST

Updated : Jul 8, 2024, 9:48 PM IST

जम्मू-काश्मीर Terror Attack On Indian Army: जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात भारतीय सैन्याच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झालाय. यात चार जवानांना वीरमरण आलं. तसंच या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहेत. संरक्षण दलातील अधिकाऱ्याने सांगितलं की, सोमवारी कठुआच्या माचेडी भागात दहशतवाद्यांनी सैनिकांच्या ताफ्यावर हल्ला केला. हा परिसर भारतीय सैनिकांच्या 9व्या कोरच्या अंतर्गत येतो.

चकमकीत गोळीबार सुरू : दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर सैनिकाच्या जवानांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. सध्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे. कठुआ शहरापासून 150 किमी अंतरावर असलेल्या बदनोटा गावात ही घटना घडली. जेव्हा काही सैनिकी वाहने या भागात नियमित गस्त घालत होती.

आधीही सहा दहशतवादी ठार : एक दिवस आधी रविवारी राजौरी जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात एक जवान जखमी झाला होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पहाटे ४ वाजता दहशतवाद्यांनी राजौरी जिल्ह्यातील मांजाकोट भागातील गुलाठी गावात प्रादेशिक सैनिकांच्या छावणीवर गोळीबार केला. यानंतर जवानांनी प्रत्युत्तर दिलं आणि सुमारे अर्धा तास चाललेल्या गोळीबारानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्याचवेळी काश्मीर खोऱ्यातील कुलगाम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या चकमकीत सहा दहशतवादी मारले गेले आणि दोन जवान शहीद झाले.

सहा जण जखमी : या आधीही अशीच एक घटना घडली होती, डोडा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात सैन्य दलाचे पाच जवान आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचा एक विशेष पोलीस अधिकारी असे सहा जण जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी 12 जूनच्या मध्यरात्री 1:45 वाजता डोडा येथील छत्तरगल्ला भागातील सैन्यदल आणि स्थानिक पोलिसांच्या चेकपोस्टवर हल्ला केला होता.

हेही वाचा -

  1. कुलगाममध्ये दोन ठिकाणी चकमक; सहा दहशतवादी ठार, अकोल्याच्या प्रवीण जंजाळ यांच्यासह एका जवानाला वीरमरण - ENCOUNTER IN KASHMIR
  2. "पंजाबमध्ये शिवसेना नेत्यावरील जीवघेणा हल्ल्याचा हिंदू किंवा शिखांशी..."-भाजपा नेत्याचं आवाहन - nihang sikh attack
  3. दक्षिण कोरिया जॉब रॅकेट प्रकरणात टेरर अँगलची शक्यता, नौदलातील अधिकारी शर्मा आणि आरोपी डागरा जम्मू काश्मीरमधील शाळेतले वर्गमित्र - South Korea job racket
Last Updated : Jul 8, 2024, 9:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details