नवी दिल्ली India Maldives Row : सध्या भारत आणि मालदीवमधील संबंध तणावाच्या काळातून जात आहेत. दरम्यान, असं असतानाच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शनिवारी (20 जानेवारी) मालदीवमध्ये एका 14 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कारण मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांनी त्याला एअरलिफ्टसाठी भारताने प्रदान केलेले डॉर्नियर विमान वापरण्याची परवानगी नाकारली होती.
काय आहे प्रकरण : मालदीवमध्ये एका 14 वर्षांच्या मुलाला ब्रेन स्ट्रोक आला. त्यामुळं त्याची प्रकृती गंभीर झाली. यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला गाफ अलिफ विलिंगिली येथील त्याच्या घरातून राजधानी माले येथे नेण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची विनंती केली. मात्र, हे एअर लिफ्ट करण्याकरीता राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी परवानगी दिली नाही, असा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केलाय.
- मुलाच्या वडिलांची प्रतिक्रिया : पीडित मुलाच्या वडिलांनी मालदीवच्या माध्यमांना सांगितलं की, "मुलाला पक्षाघाताचा झटका आल्यानंतर आम्ही तातडीनं आयलंड एव्हिएशनशी संपर्क साधला होता. परंतु, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता आम्हाला सांगितलं की, अशा प्रकरणात फक्त एअर अॅम्ब्युलन्स वापरली जाऊ शकते.
- आसंधा कंपनीचं निवेदन : आसंधा कंपनी लिमिटेडनं निवेदनात म्हटलंय की, आपत्कालीन एअर अॅम्ब्युलन्सची विनंती मिळाल्यानंतर लगेचंच रुग्णाला माले येथे नेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु, दुर्दैवाने शेवटच्या क्षणी विमानात काही तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळं आम्हाला एअर अॅम्ब्युलन्सची सुविधा देता आली नाही.