हैदराबाद Diabetes Type 2 :देशातील बहूसंख्य लोक हार्ट अटॅक तसंच डायबिटीस सारख्या आजारांनी ग्रासत चालले आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे बदलती जीवनशैली. भारताला तर मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखलं जातं. सकस आहाराकडे दुर्लक्ष, व्यायामाचा अभाव, अनुवंशिकता, हार्मोन्स असंतुलन हे यामागील कारण आहे. फास्ट फूडचे अतिसेवन हे देखील मधुमेह होण्याचं मुख्य कारणं मानलं जात आहे. एकदा मधुमेह झाला की आयुष्यभर हा रोग रुग्णांची साथ सोडत नाही.
मधुमेह चयापचन विकार आहे. ज्यामध्ये शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. याला उच्च मधुमेह म्हणतात. तर बहुतांश वेळी रुग्ण कमी मधुमेहाचा बळी ठरतो. कमी मधुमेहामध्ये ग्लुकोजची पातळी अचानक कमी होते. मधुमेह हा एक सामान्य आजार आहे. मधुमेह टाइप 2 असलेला लोकांना बऱ्याच वर्षापासून लक्षणे दिसत नाही. त्यांची लक्षणं कालांतराने विकसित होतात. टाइप 2 मधुमेहामध्ये पॅनक्रियाज पुरेशा इन्सुलिनची निर्मिती करत नाहीत. यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणाचा धोका देखील वाढतो.
मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढू शकते ?जयपूरचे ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. विजय कपूर यांनी सांगितलं की, साधारणपणे दोन प्रकारचे मधुमेह रुग्णांमध्ये आढळतात. मधुमेह टाईप 1 आणि टाईप 2, टाईप 1 मधुमेह लहान मुलांमध्ये दिसून येतो आणि हा अनुवांशिक मानला जातो. तर टाईप 2 मधुमेहाची प्रकरणं प्रौढ किंवा वृद्ध लोकांमध्ये दिसतात. परंतु आता टाइप 2 मधुमेहाची लक्षणं लहान मुलामध्ये देखील दिसू लागली आहेत. हे खुप घातक आहे. आकडेवारीनुसार सांगायचं झालं तर 10 पैकी 1 व्यक्ती मधुमेहानं ग्रस्त आहे. आगामी काळात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यात तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
गरोदरपणात मधुमेह : गर्भवती महिलांनाही डायबिटीस टाईप 2 प्रकाराचं निदान होऊ शकतो. गरोदरपणात साखरेची पातळी वाढते त्यामुळे गर्भावस्थेतील मधुमेहाची समस्या उद्धवते. यामुळे प्रसूती दरम्यान धोका वाढू शकतो. वेगवेगळ्या निकषांच्या आधारे 6 ते 16 टक्के गर्भवती महिलांना गर्भधारणेदरम्यान डायबिटीजचं निदान होतं. यात वाढ होऊ नये म्हणून गर्भवती महिलांना आहाराच्या माध्यमातून आणि गरज पडल्यास इन्सुलिनचा वापर करुन साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं लागतं.