महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढल्या : गृहमंत्रालयानं दिली सीबीआयला खटला चालवण्यास परवानगी - Lalu Prasad Yadav Laand For Job - LALU PRASAD YADAV LAAND FOR JOB

Lalu Prasad Yadav Laand For Job Case : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. गृहमंत्रालयानं लालू प्रसाद यादव यांच्या लँड फॉर जॉब प्रकरणात खटला चालवण्यासाठी परवानगी दिली आहे, अशी माहिती सीबीआयनं आज न्यायालयात दिली.

Lalu Prasad Yadav Laand For Job Case
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2024, 2:14 PM IST

नवी दिल्ली Lalu Prasad Yadav Laand For Job Case: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लँड फॉर जॉब घोटाळ्याचा आरोप असलेल्या प्रकरणात गृहमंत्रालयानं सीबीआयला खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. आज सीबीआयनं राऊस अ‍ॅव्हेन्यू न्यायालयात याबाबतची माहिती दिली. गृहमंत्रालयानं लालू प्रसाद यादव यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी दिली आहे. तर उर्वरित आरोपींविरुद्ध परवानगी मिळण्यास आणखी 15 दिवस लागतील. त्यानंतर विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 ऑक्टोबरला ठेवण्याचे आदेश जारी केले.

राऊस अ‍ॅव्हेन्यू न्यायालय (ETV Bharat)

नोकरीसाठी जमीन प्रकरण :लँड फॉर जॉब घोटाळा करण्यात आल्याचा आरोप बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्यावर कथित आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी सुनावणी सुरू असताना सीबीआयनं आज राऊज अव्हेन्यू न्यायालयात याबाबतची माहिती दिली. गृहमंत्रालयानं माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज न्यायालयात दिली. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

हेही वाचा :

  1. लँड फॉर जॉब प्रकरण : लालू प्रसाद यादव यांच्यानंतर आज तेजस्वी यादवांची ईडी चौकशी
  2. लालू पिता-पुत्रांच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून समन्स; 'या' घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलं
  3. Lalu Yadav Bail : जमीन घोटाळा प्रकरणात लालू यादव व कुटुंबियांना जामीन मंजूर

ABOUT THE AUTHOR

...view details