महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गँगस्टर मुलानं स्वत:च्या त्वचेपासून बनवली आईसाठी चप्पल; रामायणापासून घेतली प्रेरणा - history sheeter Raunak Gurjar

History Sheeter Raunak Gurjar : सध्याच्या काळात काही निर्दयी मुलं आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत असताना आपल्याला दिसतात. तर दुसरीकडं काही मुलं आपल्या आई-वडिलांचा प्रेमानं सांभाळ करताना दिसतात. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्येही असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. रौनक गुर्जर या गँगस्टरनं चक्क स्वत:च्या त्वचेपासून आईसाठी चप्पल बनवलीय.

HISTORY SHEETER RAUNAK GURJAR
रौनक गुर्जर

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 7:19 PM IST

जितेंद्र महाराज यांची प्रतिक्रिया

उज्जैन History Sheeter Raunak Gurjar : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एकानं चक्क 'आई'साठी स्वत:ची त्वचा वापरून चप्पल तयार केलीय. उज्जैनमधील सांदीपनी नगर येथील आखाडा मैदानावर सात दिवस चाललेल्या भागवत कथेदरम्यान हा प्रसंग घडलाय. त्यामुळं याची सोशल मीडियावर चर्चा सुरूय.

रामायणाच्या प्रेरणेमुळं मन परिवर्तन :उज्जैनमधील धाचा भवनमध्ये राहणाऱ्या रौनक गुर्जर या गँगस्टरची ही गोष्ट आहे. बुधवारी संध्याकाळी रौनक गुर्जर रुग्णवाहिकेनं भागवत कथा सुरू असलेल्या ठिकणी पोहचला. तेव्हा, त्याच्या पायावरची पट्टी पाहून लोकांनी अनेक अंदाज बांधायला सुरुवात केली, मात्र जेव्हा वास्तव समोर आलं, तेव्हा सगळेच थक्क झाले. हा प्रसंग पाहून काहींना आपले अश्रू आवरता आले नाहीत. राम भजनाच्या वेळी रौनक गुर्जर यानं कथाकार जितेंद्र महाराज यांच्याशी संपर्क साधला. रौनकनं महाराजांना सांगितलं की, "रामायणाच्या प्रेरणेमुळं मी माझी त्वचा काढून माझ्या आईसाठी चप्पल बनवलीय." हे ऐकून सगळेच थक्क झाले. त्यामुळं हे ऐकून आईच्या डोळ्यात देखील पाणी आलं. यावेळी आईनं रौनक गुर्जर याला आशीर्वाद दिले. तसंच मुलानं बनवलेली चप्पल त्यांनी तिथंच परिधान केली.

रौनक गुर्जर एकेकाळी होता गुन्हेगार : रौनक गुर्जरच्या भूतकाळातील जीवनाबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल. रौनक गुर्जर हा एकेकाळी मोठा गुन्हेगार होता. काही वर्षांपूर्वी पलायनाच्या वेळी पोलिसांनी त्याला गोळी मारली होती. त्यामुळं त्याला काही काळ तुरूंगात देखील राहावं लागलं. मात्र, नंतर त्यानं यातून बाहेर पडत प्रॉपर्टीच्या व्यवसायाबरोबरच सामाजिक, धार्मिक कार्य करण्यास सुरुवात केली. त्यामुळं त्याच्या मानसिकतेत मोठा बदल झाला. म्हणून त्यानं मांडीच्या त्वचेपासून त्याच्या आईसाठी चप्पल बनवली.

भागवत कथेच्या वेळी आईला दिली भेट : सांदिपनी नगरच्या आखाडा मैदान परिसरात सात दिवसीय भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. आध्यात्मिक गुरू जितेंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भागवत कथेदरम्यान रौनक गुर्जर यानं आपला संकल्प पूर्ण केला असून, स्वतःच्या त्वचेपासून बनवेली चप्पल त्यानं आईला भेट दिलीय.

हे वाचलंत का :

  1. 'या' राशीच्या लोकांना मिळेल कामात यश; वाचा राशी भविष्य - Horoscope 2024
  2. 23 मार्च 2024 पंचांग : काय आहे आजचा शुभ मुहूर्त, योग आणि राहूकाळ - Today Panchang
  3. 22 मार्च 2024 पंचांग ; काय आहे आजचा शुभमुहूर्त, योग आणि राहूकाळ - Today Panchang

ABOUT THE AUTHOR

...view details