सोलापूर : तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी रविवारी सायंकाळी सोलापुरात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. शेतकऱ्यांसाठी तेलंगाणा राज्य सरकारनं काय काय विकास कामे केलीत आहेत, त्यावर खुलासा केला. आम्ही तेलंगाणा राज्यातील जनतेसाठी सहा विकास योजना आणल्या आहेत. त्या विकास योजना पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पाठवावे. अडचण आल्यास विमानाची व्यवस्था मी करतो आणि त्यांना तेलंगाणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणलेली विकास कामे दाखवतो. असं थेट ओपन चॅलेंज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना दिलं.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले आहेत. सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधून आम्ही तेलंगाणा राज्यात सहा विशेष योजना आणल्या आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यात तेलंगाणा राज्य सरकारला यश आलं आहे. या सहा योजना पाहण्यासाठी आम्ही पंतप्रधान यांना आवाहन करत आहे, महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना तेलंगाणा राज्यात पाठवून द्या. काही अडचणी आल्यास आम्ही विमान देखील पाठवून देतो. असं रेवंत रेड्डी म्हणाले.
महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. याकरता निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून, सोमवारी १८ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता निवडणूक प्रचाराची सांगता होणार आहे. राज्यात झालेल्या पक्षांतराच्या नाट्यमय घडामोडीनंतर, लोकसभेनंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असल्यानं महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मोठी चुरस निर्माण झालीय.
हेही वाचा -