नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विदर्भातील चारही सभा रद्द केल्या आहेत. त्यांच्या भाजपा नेत्या स्मृती इराणी आणि केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या एकूण चार सभा होणार आहेत.
गेली काही दिवस अमित शाह यांनी राज्यात प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे. त्यानुसार विदर्भात त्यांच्या आजदेखील चार सभांचे नियोजन करण्यात आलं होतं. सूत्राच्या माहितीनुसार मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गृहमंत्री देशाच्या राजधानीत परतले आहेत. ईशान्येकडील राज्यांतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री आज दिल्लीत बैठक घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रानं दिली.
स्मृती इराणी आणि शिवराजसिंह चौहान यांच्या होणार सभा
- केंद्रीय अमित शाह यांच्या सभा रद्द झाल्यानंतर स्मृती इराणी या आज दुपारी दुपारी १२ वाजता गडचिरोली शहरात तर दुपारी १ वाजता वर्धा शहरात सभा घेणार आहेत.
- केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान दुपारी ३ वाजता काटोलमध्ये आणि दुपारी ४ वाजता सावनेर येथे सभा घेणार आहेत.
मणिपूरमध्ये चिंताजनक स्थिती- शनिवारी रात्री इम्फाळ खोऱ्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. संतप्त जमावानं भाजप आमदारांच्या निवासस्थानांना आग लावली. यात ज्येष्ठ मंत्र्यांच्या घरालादेखील जमावानं आग लावली. संतप्त जमावारून काँग्रेसच्या एका आमदाराच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न सतर्क असलेल्या सुरक्षा दलानं हाणून पाडला. केंद्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांचे एक पथक लवकरच मणिपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहे. केंद्र सरकारचे सुरक्षा पथक सरकारला परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारला मदत करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पंतप्रधान मोदींनी मणिपूरला भेट द्यावी-राहुल गांधी-"मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसक चकमकी आणि नेहमी घडणारा रक्तपात अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. केंद्र आणि राज्य सरकारानं सामंजस्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत. पंतप्रधान मोदींनी मणिपूरला भेट द्यावी, "असे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये आहे. मणिपूरमध्ये शांतता आणि चांगले वातावरण पूर्ववत करण्यासाठी काम करावे, असेदेखील राहुल गांधींनी म्हटले.
हेही वाचा-