ETV Bharat / spiritual

'या' 5 राशींचा उत्तम काळ, व्यवसायात होणार मोठा आर्थिक लाभ; कामात मिळेल पदोन्नती, वाचा राशीभविष्य

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Today Horoscope
आजचं राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

मेष (ARIES) : मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या तिसऱ्या स्थानी असेल. आज आपलं मन चंचन झाल्यानं निर्णय घेणे कठीण जाईल आणि त्यामुळं महत्वाची कामे आपण पूर्ण करू शकणार नाही. प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागेल. नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. बौद्धिक किंवा तांत्रिक चर्चेत आपण सहभागी होऊ नये. आज छोटासा प्रवास संभवतो. आज स्त्रीयांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. साहित्य लेखनासाठी आजचा दिवस चांगला असल्यानं आपण आपली प्रतिभा शक्ती दाखवू शकाल.

वृषभ (TAURUS) : मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या दुसऱ्या स्थानी असेल. आज मन स्थिर ठेवून काम न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात. आज हट्ट न करता समाधानी राहिलात तर चांगले होईल. ठरविलेले प्रवास होणार नाहीत. भावंडांकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. कलावंत, कारागीर, लेखक हे आपली प्रतिभा दाखवू शकतील. स्वास्थ्य उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकाल.

मिथुन (GEMINI) : मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिकदृष्टया लाभदायी आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्टया आपणास प्रसन्नता आणि उत्साह यांचा अनुभव येईल. स्वादिष्ट भोजन व चांगले कपडे घालावयास मिळतील. मित्र आणि कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवाल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. आर्थिक फायदा होईल. मनात येणार्‍या नकारात्मक विचारांना काढून टाकण्याचा प्रयत्न करा. दांपत्य जीवन सुखावह होईल.

कर्क (CANCER) : मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या बाराव्या स्थानी असेल. आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळं मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा होईल. संभाव्य वाद टाळण्यासाठी बोलण्यावर संयम ठेवा. इतरांचे गैरसमज दूर केल्यामुळं प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मान - प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे.

सिंह (LEO) : मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आज व्यापारात लाभ आणि मिळकतीत वाढ होईल. उत्तम भोजन प्राप्ती होईल. मित्रांसह रम्य स्थळाला भेट देऊ शकता. स्त्री मित्रांचे विशेष सहाय्य मिळेल. मुलाची भेट होईल. वाडवडील किंवा मोठया भावंडांचा सहवास मिळेल. एखादा मंगल प्रसंग असू शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहील. पत्नीचे सहकार्य लाभेल. आजचा दिवस नवीन वस्तू खरेदीला अनुकूल आहे.

कन्या (VIRGO) : मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल. व्यापार आणि नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश झाल्यानं पदोन्नतीची संधी मिळेल. वडीलांनकडून फायदा होईल. स्वास्थ्य चांगले राहील. कुटुंबातील वातावरण आनंदाचं राहील. पत्नीसह चांगला वेळ घालवाल. व्यावसायिक कामासाठी बाहेर जावे लागेल.

तूळ (LIBRA) : मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज नव्या कामाची सुरूवात करण्याचा आपण प्रयत्न कराल. बौद्धिक काम आणि साहित्य लेखन यात गुंतून राहाल. प्रवासाची संधी मिळेल. परदेशात राहणारे मित्र आणि सगे सोयरे ह्यांची खुशाली समजल्यानं आपण आनंदात राहाल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. संततीची चिंता लागून राहील. आज कोणत्याही चर्चेत किंवा वाद-विवादात भाग न घेणे हितावह राहील.

वृश्चिक (SCORPIO) : मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आज आपणास प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कफ, श्वास, किंवा पोट यांचा त्रास होऊ शकतो. शरीराने व मनाने आज आपण अस्वस्थ राहाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणतेही अवैध काम किंवा सरकारी काम ह्या पासून दूर राहा, नाहीतर अडचणीत याल. जलाशया पासून दूर राहा. आज खर्च खूप वाढतील.

धनू (SAGITTARIUS) : मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या सातव्या स्थानी असेल. आजचा दिवस सुखशांती व आनंदात व्यतित होईल. मित्रांचा सहवास, स्वादिष्ट भोजन, नवे कपडे इत्यादी प्राप्त होतील.भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण वाढेल. त्यांच्याशी रोमांचक भेट होईल. विचारात स्थैर्य राहणार नाही. भागीदारीत फायदा होईल. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान होतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

मकर (CAPRICORN) : मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या सहाव्या स्थानी असेल. आज व्यापार-व्यवसायात मोठे यश मिळाले तरी आपण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. व्यापार - व्यवसायाच्या दृष्टीनं केलेल्या भावी योजना यशस्वी होतील. आर्थिक देवाण-घेवाणीचा व्यवहार व्यवस्थित पार पडेल. देश- परदेशात व्यवसाय असणार्याना फायदा होईल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. धनलाभ संभवतो. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.

कुंभ (AQUARIUS) : मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या पाचव्या स्थानी असेल. आज आपण बौद्धिक क्षमता, लेखनकार्य व नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाहीत व त्यात सातत्याने बदल होत राहील. स्त्रीयांनी आपली वाणी संयमित ठेवावी. शक्यतो आज प्रवास टाळावेत. संततीसंबंधी प्रश्न भेडसावतील. आज नवीन काम सुरू न करणे हितावह राहील. अचानक खर्च उदभवण्याची शक्यता असल्यानं त्याची तरतूद करून ठेवावी.

मीन (PISCES) : मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या चौथ्या स्थानी असेल. आज घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवावी लागतील. घरातील वातावरण बिघडू नये ह्यासाठी संभाव्य वाद टाळावेत. आईचे आरोग्य बिघण्याची शक्यता आहे. धन आणि प्रतिष्ठेची हानी संभवते. स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे. उत्साह आणि स्फूर्तीचा अभाव जाणवेल. शक्यतो प्रवास टाळावेत. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे. आज आपण अती हळवे झाल्याचा त्रास होईल.

हेही वाचा -

कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.