महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बंगळुरू शहराला वादळी पावसानं झोडपलं; झाडं कोलमडली, मेट्रो सेवा विस्कळीत - Heavy Rains In Bengaluru - HEAVY RAINS IN BENGALURU

Heavy Rains In Bengaluru : वादळी पावसामुळे बंगळुरू शहरात मोठा हाहाकार उडाला. वादळी पावसानं शहरातील मोठी झाडं उन्मळून पडली. त्यामुळे मेट्रो सेवा विस्कळीत झाली.

Heavy Rains In Bengaluru
वादळी पाऊस (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 2:43 PM IST

बंगळुरू Heavy Rains In Bengaluru : रविवारी संध्याकाळी बंगळुरू शहरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. या पावसामुळं अनेक ठिकाणी झाडं पडून मोठं नुकसान झालं. शेषाद्रिपुरम, शिवानंद सर्कल, विजयनगर, शिवाजीनगर, मल्लेश्वरम, वसंतनगर, शांतीनगर, जयनगर, यशवंतपूर, राजाजीनगर, कोरमंगला, एमजी रोड, कब्बन पार्क, बनशंकरी, कुमारस्वामी लेआऊट, इलाचेनाहल्ली, पादानगर या भागात पावसामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. पावसामुळे बंगळुरू शहरातील मेट्रो रेल्वे सेवा काही काळ ठप्प झाल्यानं नागरिकांचे चांगलेच हाल झाले.

बंगळुरू शहरात मुसळधार पाऊस :मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसानं हजेरी लावली. बंगळुरू शहरात रविवारी सायंकाळी अचानक मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं नागरिकांना चांगलंच झोडपलं. यावेळी वादळी वाऱ्याच्या तडाख्यानं अनेक ठिकाणी झाडं कोलमडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेषाद्रिपुरम, शिवानंद सर्कल, विजयनगर, शिवाजीनगर, मल्लेश्वरम, वसंतनगर, शांतीनगर, जयनगर, यशवंतपूर, राजाजीनगर, कोरमंगला, एमजी रोड, कब्बन पार्क, बनशंकरी, कुमारस्वामी लेआऊट, इलाचेनाहल्ली, पादानगर या भागातील अनेक झाडं वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडली.

मान्सून राज्यात दाखल :रविवारी मान्सून राज्यात दाखल झाल्यानं बहुतांश जिल्ह्यांत पाऊस पडत आहे. कर्नाटकातील 14 जिल्ह्यात हवामान विभागानं यलो अलर्ट जाहीर केला आहे, अशी माहिती हवामान विभागातील सूत्रांनी दिली आहे. एमएमटी जंक्शन आणि बंगळुरूच्या कस्तुरीनगर बाजूकडून केआर पुराच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर एमएमटी बसस्थानकाजवळ पावसाचं पाणी भरलं. त्यामुळे व्हाईटफिल्ड आणि महादेवपूरकडं जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. जयमहल मेन रोडवरुन कस्तुरीनगरकडं जाणाऱ्या रस्त्यावर टिन फॅक्टरीच्या बाजूनं राममूर्ती नगरकडं जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचलं. त्यामुळे नागरिकांना मोठ्या वाहनकोंडीला सामोरं जावं लागलं.

मेट्रो रेल्वे सेवा विस्कळीत :बंगळुरू शहरात झालेल्या वादळी पावसामुळे एमजी रोड आणि ट्रिनिटी स्थानकांदरम्यानच्या ट्रॅकवर झाडं पडली. त्यामुळे एमजी रोड ते इंदिरा नगर दरम्यान मेट्रो रेल्वे सेवा काही काळापुरती बंद ठेवण्यात आली. इंदिरानगर आणि व्हाईटफिल्ड आणि पर्पल लाईनवरील चल्लाघट्टा आणि एमजी रोड मेट्रो स्थानकांदरम्यान शॉर्ट लूप सुरू आहेत, अशी माहिती नम्मा मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी श्रीनिवास राजगोपालन यांनी दिली. बंगळुरू शहरात 69 मीमी पाऊस झाला.

हेही वाचा :

  1. पाऊस लांबला तरी चिंता नाही; कोयना धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक - Koyna Dam
  2. ऐन लग्नातच पावसाचा धुमाकूळ...; धो धो पावसात नवरदेव-नवरीने केली एन्ट्री... पाहा व्हिडिओ - Wedding Ceremon
  3. मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी; वादळी वाऱ्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर - Mumbai Train Update

ABOUT THE AUTHOR

...view details